Continues below advertisement

जळगाव : लग्न आणि शुभकार्यासाठी सोनं (gold) खरेदी करुन आर्थिक गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. याशिवाय लग्नकार्यात महिलांसाठी विशेष आभूषण म्हणून सोनं खरेदी केली जाते. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या वडिलांना सोनं खरेदी आता आवाक्याबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली असून सोने दरवाढीने नवा उच्चांक गाठला आहे. सोने खरेदीचं माहेरघर समजलं जाणाऱ्या जळगावमध्ये (Jalgaon) सोन्याचे दर प्रतितोळा 1 लाख 14 हजार 300 रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी सोन्याचे दर 1 लाख 2 ते 5 हजार एवढ्या किंमतीवर होते, मात्र गणेशोत्सवानंतर पुन्हा सोन्याला झळाळी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या दरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने वाढ होत असून 4 दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोन्याचा दर एका तोळ्यासाठी 1 लाख 10 हजार 650 रुपये एवढा होता. तर, चांदीचा एक किलोचा दर 129350 रुपयांवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. गत काही वर्षात वाढलेल्या सोन्याच्या दरामुळे सोन्यातील गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. त्यातच, आज सोने दरवाढीने नवा उच्चांक गाठला आहे.

Continues below advertisement

अमेरिकेने जगभर अनेक देशावर लावलेल्या टेरीफनंतर आता अमेरिकन फेडरल बँकेने त्यांच्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून, सोन्याच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदार वळल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणजे सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात एक हजार रूपयांची वाढ होऊन सोन्याचे दर जीएसटी शिवाय 1 लाख 10 हजार रुपये प्रतितोळ्यावरुन 1 लाख अकरा हजारांवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे GST सह सोन्याचे दर 1 लाख 14 हजार 300 रुपये इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे, सोने सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्याचं बोललं जात आहे.

मुंबईतील झवेरी बाजार मोठं मार्केट

देशातील सर्वात मोठा सराफा बाजार मुंबईतील झवेरी येथे आहे. याशिवाय केरळच्या त्रिशूरला गोल्ड कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलं जातं. भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथील झवेरी बाजाराला देशातील सर्वात मोठा बाजार म्हटलं जातं. हा आशियातील सर्वात मोठा सोन्याचा बाजार मानला जातो. मुंबईचा झवेरी बाजार 160 वर्षू जुना आहे. 1864 मध्ये सराफा व्यापारी त्रिभुवनदास झवेरी यांनी याची सुरावत केली होती. तेव्हापासून या बाजाराला झवेरी बाजार म्हटलं जातं.

हेही वाचा

अजित पवारांच्या प्रचाराच्या छुप्या पॅटर्नचा भाजपला धसका, सरकारी यंत्रणा हाताशी धरुन दादांनी धुरळाच उडवला