Eknath Khadse : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे लवकरच भाजपत प्रवेश करणार आहेत. स्वतः एकनाथ खडसे यांनीच याबाबत माहिती दिली होती. आता ते भाजपत नक्की प्रवेश करणार एकनाथ खडसेंनीच स्पष्टीकरण दिले आहे. 


दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांच्याशी चर्चा करून एकनाथ खडसे आज त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, आपण लवकरच येत्या पंधरा दिवसात भाजप मध्ये प्रवेश करणार आहे. कोणत्याही अटीशर्ती शिवाय मी प्रवेश करणार आहे. 


माझी नाराजी कमी झाल्याने पुन्हा भाजपमध्ये येणार


भाजप हे माझे घर आहे. पक्षाच्या पायाधरणीपासून मी भाजपमध्ये राहिलो आहे. भाजपमध्ये माझं योगदान राहिले होतो. चाळीस वर्षे मी भाजपामध्ये (BJP) होतो. काही नाराजीमुळे मी बाहेर पडलो होतो. मात्र आता माझी नाराजी कमी झाल्याने मी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करत आहे. 


शरद पवारांचा मी ऋणी - एकनाथ खडसे


शरद पवार (Sharad Pawar) यांनी संकटकाळात साथ दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता जी परिस्थिती आहे ती पाहता मी जयंत पाटील (Jayant Patil) यांना सांगितली आहे. त्यांची अनुकूलता पाहून मी भाजपमधे जाण्याचा हा निर्णय घेतला असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या घरवापसीमुळे जळगावात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे आता जळगाव लोकसभेची निवडणूक आणखी निकाराची होईल, असे बोलले जात आहे.  


रोहिणी खडसेंनी घेतली वेगळी भूमिका 


एकीकडे एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असतानाच दुसरीकडे त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे. मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार (Sharad Pawar) साहेबांसोबतच, असे ट्विट रोहिणी खडसे यांनी केले आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी : 'या' एका अटीवर खडसेंची घरवापसी; शरद पवारांना धक्का देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन


Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपची वाट खडतर? गिरीश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट, उन्मेष पाटलांचाही घेतला खरपूस समाचार!