Eknath Khadse : मराठा आरक्षणाबाबतच्या (Maratha Reservation) सर्व मागण्या सरकारकडून मान्य झाल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारच्या या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  शासनाने जो जीआर काढला आहे. तो जीआर म्हणजे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


एकनाथ खडसे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत रक्ताचे नाते असल्याशिवाय त्याला दाखला देता येणार नाही, अशा मागासवर्ग आयोगाच्या सूचना नाही तर त्यांनी असे कायद्यात स्पष्टपणे नमूद करून ठेवले आहे. हा विषय राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय मागासवर्गाने मान्य केल्या शिवाय त्याला कायदेशीर स्वरूप येणार नाही. 


निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारचा निर्णय - एकनाथ खडसे


सरकार प्रत्येक निर्णय आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेत आहे. क्युरेटिव्ह पिटीशननंतर सरकारने निर्णय घ्यायला हवा होता. महाराष्ट्रातील मराठा वर्ग नाराज करून सरकारला चालणार नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीत निर्णय घेऊन आपल्या गळ्यातलं घोंगड झटकून टाकावे, अशी अवस्था आज सरकारची दिसत आहे, असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी केला आहे.


झुंडशाहीने कायदे, नियम बदलता येत नाही - छगन भुजबळ


छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, मराठा समाजाचा विजय झाला असे तुम्हाला वाटते. पण मला तसे वाटत नाही. झुंडशाहीच्या विरोधात असे निर्णय घेता येत नाही. ही सूचना आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत.  जे वकील असतील त्यांनी हरकती पाठवाव्यात. लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्यात. सरकारच्या लक्षात येईल याची दुसरी बाजू देखील आहे. 


कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण दिले जाईल - दादा भुसे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब करत कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिले जाईल, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगेंचे उपोषण मागे


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या संपूर्ण मागण्या मान्य झाल्या असल्याने, त्यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. यावेळी अनेक मंत्री उपस्थित होते. 


आणखी वाचा


Ulhas Bapat on CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे शब्द लिहून घेतले, एकनाथ शिंदेंकडून मराठ्यांची दिशाभूल : घटनातज्ज्ञ उल्हास बापट