जळगाव: सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल आणि तिला महत्त्व प्राप्त होईल हे सांगता येत नाही. दिग्दर्शक, गायक, संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Singer Avadhoot Gupte) बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आधारित प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेंनी म्हटलेले गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जामनेर येथे भाऊबीज निमित्त प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अवधूत गुप्ते यांनी गिरीश महाजन यांची मुलाखत घेतली. अवधूत गुप्ते यांच्या रोखठोक प्रश्नांना मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीमधून गिरीश महाजन यांचा राजकीय प्रवास समोर आला आहे. तसेच गिरीश महाजन यांच्या राजकीय संघर्षावर झेंडा-2 हा चित्रपट करणार असल्याची घोषणा यावेळी प्रसिद्ध गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या गीताचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी म्हटलेल्या गिरीश महाजन यांच्यावर आधारित गिरीश महाजन भाऊंची ख्याती...संकटमोचक आमच्यासाठी...या गाण्याने जिल्ह्यात धूम उडवून दिली आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
जामनेर शहरात दिवाळी संध्या कार्यक्रम उदंड उत्साहात पार पडला. ख्यातनाम गायक अवधूत गुप्ते आणि त्यांच्या सहकार्यांनी एका-पेक्षा-एक सरस गाणे सादर करून रसिकांची मने जिंकली. याच कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्याचा गौरव करणारे ....गिरीश महाजन भाऊंची ख्याती...संकटमोचक आमच्यासाठी...या आशयाचे गाणे सादर केले. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी या गाण्याला प्रचंड प्रतिसाद देत जल्लोष केल्याच पाहायला मिळालं.
दरम्यान याच कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी गिरीश महाजन यांच्या राजकीय संघर्षावर आधारित मराठी चित्रपट काढणार असल्याचे जाहीर केले आहे. आता चित्रपटापूर्वीच गिरीश महाजन यांच्यावरील आलेल्या गाण्याने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. गिरीश महाजन यांच्यावरील गिरीश महाजन भाऊंची ख्याती...संकटमोचक आमच्यासाठी...या अशा आशयाचे गाणे सोशल मीडियात व्हायरल झाले असून या गाण्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिल्याचं पाहायला मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :