Gold Price News : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेतील फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदरांनी आपली गुंतवणूक ही सोन्यात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं गेल्या 48 तासात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर हे GST सह 66100 रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. 


अमेरिकन फेडरल बँकानी केली व्याजदरात कपात


जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकानी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे मागणीत मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात दोन दिवसात तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वी सोन्याचे दर जीएसटीसह 64100 होते. तेच सोन्याचे दर आज तब्बल 66100 इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. आगामी काळात अजूनही सोन्याचे दर वाढ होण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे


सोन्याच्या या वाढत्या दरामुळं ग्राहकांचा फारसा प्रतिसाद सोने खरेदीसाठी नसल्याचे पाहायला मिळत आहे. घरात लग्नकार्य असल्यानं सोने खरेदी करणे गरजेचे असल्यानं काहीजण वाढत्या जरातही खरेदी करत आहेत. अचानक सोन्याच्या वाढत्या दरामुळं बजेट बिघडल्याची माहिती अनेक ग्राहकांनी दिली आहे.  सोने खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्यानं ग्राहकांनी खंत व्यक्त केली आहे.