मुंबई: भारतीय स्मार्टफोन कंपनी इंटेक्सनं नुकताच अॅक्वा क्लासिक स्मार्टफोन सीरीज लाँच केली होती. आता कंपनीने त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. अॅक्वा 3G प्रो Q स्मार्टफोन लाँच केला असून याची किंमत 2,999 रु. आहे.


 

हा स्मार्टफोन कंपनीनं वेबसाइटवर लिस्ट केला आहे. हा फोन अॅक्वा 3G प्रोचं अपडेटेड व्हर्जन आहे. या स्मार्टफोन अनेक फीचर देण्यात आले आहेत. यामध्ये 4 इंच डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 480x800 पिक्सल आहे. तसंच यामध्ये 1.2Ghz क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. 512 MB रॅम असून यात 4 जीबी इंटरनल मेमरी आहे.

 

या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 0.3 जीबी फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 1300mAh बॅटरी आहे. तर कनेक्टिव्हीटीचा विचार केल्यास 3जी, जीपीएस, ब्ल्यूटूथ, वाय-फाय, यूएसबी यासारखे फीचर आहेत.