मुंबई : मागील आठवड्यात सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी 'क्रिती' ही शॉर्ट फिल्म यू ट्यूबवरुन हटवण्यात आवी आहे. 'क्रिती' शॉर्ट फिल्म शिरीष कुंदरने दिग्दर्शित केली होती. मात्र 'क्रिती' ही नेपाळी शॉर्ट फिल्मची हुबेहूब कॉपी असल्याचं आरोप होत आहे.

 

 

नेपाळी दिग्दर्शक अनिल नेउपाने यांचा दावा आहे की, "शिरीषची शॉर्ट फिल्म, माझ्या 'बॉब' या शॉर्ट फिल्मची कॉपी आहे, जी शिरीषने चोरली आहे."

 

 

मात्र ही शॉर्टफिल्म आता यू ट्यूबवरुन हटवण्यात आली आहे. 'क्रिती'मध्ये राधिका आपटे, मनोज वाजपेयी आणि नेहा शर्मा यांची मुख्य भूमिका आहे. अनिल नेउपाने यांच्या कॉपीराईटच्या दाव्यानंतर ही शॉर्ट फिल्म आता यू ट्यूबवर उपलब्ध नाही.

 

 

अनिल नेउपाने यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती की, "क्रितीची कहाणी माझी शॉर्ट फिल्म 'बॉब'मधून चोरली आहे. मी 2015 ही शॉर्ट फिल्म बनवली होती."

 

अनिल नेउपाेची 'बॉब' शॉर्ट फिल्म