Indian Army:  भारतीय लष्करात सध्या अनेक बदल होताना दिसत आहेत. स्त्री-पुरुष समानतेसोबत भारतीय लष्कराला (Indian Army) मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. आता भारतीय लष्करी ब्रिगेडीयर तसेच त्याच्यावरील अधिकाऱ्यांना एकसारखे गणवेश (Army Uniform) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या भारतीय लष्कराच्या संमेलनतील विस्तृत चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु लष्करातील कर्नल आणि त्यांच्या खालच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या गणवेशमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिगेडीयर आणि त्यावरील अधिकाऱ्यांचे हेडगियर, शोल्डर रँक बॅज, गॉर्गेट पॅच, बेल्ट आणि शूज आता सारखेच असतील. हा बदल यावर्षी एक ऑगस्टपासून करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


असा निर्णय का घेण्यात आला? 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीमेवरील जवानांमध्ये सामान्य ओळख आणि दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. हा निर्णय कोणताही पक्षपाती पणा न करता भारतीय सैन्याला एकत्र आणि एकसमान बांधून ठेवण्यासाठी घेतला असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. 


या अधिकाऱ्यांसाठी नसतात रेजिमेंटल सीमा


मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल आणि जनरल यांच्यासह ब्रिगेडियर  आणि त्यावरील अधिकाऱ्यांना रेजिमेंटल सीमा नसतात.


लष्करात महिलांचा समावेश 


6 जानेवारी 2024 रोजी होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्यपथावर केवळ महिलांचा समावेश केला जाईल. परेड व्यतिरिक्त संचलन पथक, तबला आणि सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त महिलाच दिसतील. संरक्षण मंत्रालयाने लष्करी दल आणि परेडमध्ये सहभागी असलेल्या इतर विभागांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, ज्याचा उद्देश महिलांना नेतृत्व देणे आणि भविष्यातील नेतृत्वासाठी त्यांना तयार करणे आहे. गेल्या महिन्यात 29 एप्रिल रोजी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान यांना बेड्या