Zomato Annual Report: खाण्यापिण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कुणी धरू शकत नाही. फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने 2022 (Zomato) मध्ये लोकांनी कोणत्या डिशची सर्वात जास्त ऑर्डर दिली होती? याचा डेटा जारी केला आहे. भारतीय लोक संपूर्ण वर्ष (Year Ender 2022) स्वादिष्ट बिर्याणीवर (Biryani) ताव मारल्याचे दिसून आले आहे. बिर्याणीची चर्च तर आहेच मात्र या रिपोर्टमध्ये समोर आलेल्या एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा आहे. झोमॅटोने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये टॉप कस्टमरची देखील नाव समोर आले आहे. झोमॅटोच्या या टॉप कस्टमरने वर्षभरात झोमॅटोवरून तब्बल 3 हजार 330 फूड ऑर्डर केल्या आहेत.
झोमॅटोने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, दिल्लीच्या अंकुरने 2022 साली झोमॅटोवरून तब्बल 3 हजार 330 ऑर्डर केल्या आहेत. जर सरासरी काढली तर अंकुरने दिवसाला नऊ ऑर्डर केल्या आहेत. अंकुरचे जेवणारील प्रेम पाहता झोमॅटोने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये अंकुर देशातील सर्वात मोठा खाद्यप्रेमीचा देखील किताब दिला आहे,
रिपोर्टमध्ये त्या शहराचा देखील उल्लेख केला आहे, ज्यांनी ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे पैसे वाचवण्यासाठी सर्वात जास्त प्रोमोकोडचा वापर केला आहे. या यादीत पश्चिम बंगालच्या रायगंजचा समावेश आहे. या शहरातील नागरिकांना सर्वात जास्त ऑफर आवडते कारण शहरात झोमॅटोवर 99.7 टक्के प्रोमो कोड लावण्यात आला आहे. एवढच नाही तर झोमॅटोने त्या ग्राहकाविषयी देखील माहिती दिले आहे. ज्या ग्राहकाने सर्वात अधिक डिस्काऊंटचा वापर केला आहे. मुंबईच्या एका झोमॅटो यूजरने सर्व ऑर्डरवर जवळपास अडीच लाख रुपये वाचवले आहेत.
2022 वर्षातील लोकांचा आवडता खाद्यपदार्थ 'बिर्याणी'
फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने 2022 मध्ये लोकांनी ऑनलाइन काय ऑर्डर केले? याचा डेटा जारी केला आहे. 'How India Swiggy'D 2022' या वार्षिक ट्रेंडमध्ये, वर्षातील सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश 'बिर्याणी' आहे. या अहवालानुसार, कितीही पदार्थ बनवले जात असले तरी 2022 मध्ये फक्त बिर्याणीने आपली ताकद दाखवून दिली आहे. ही डिश प्रत्येक मिनिटाला 137 वेळा ऑर्डर केली गेली आहे, म्हणजे प्रति सेकंद 2 बिर्याणी. या वर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या टॉप 5 डिशमध्ये 'चिकन बिर्याणी' अव्वल आहे.
संबंधित बातम्या :