हैदराबाद : तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास असदुद्दीन ओवेसींना हैदराबादमधून पळवून लावू, असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. योगींच्या या वक्तव्यांवर ओवेसी आज रात्रीच्या सभेत भाषणातून उत्तर देणार आहेत.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. त्यात आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विकारपुरमधील तंदूर येथे प्रचारसभेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींवर हल्लाबोल केला. तेलंगाणात जर भाजपची सत्ता आली तर हैदराबादच्या निजामाला जसे पळवून लावले होते, तसे ओवेसींना हैदराबादमधून पळवून लावू, असे योगी म्हणाले.

माझे उत्तर ऐकण्यासाठी रात्री 7 ते 10 वाजता होणाऱ्या सभेतील माझे भाषण योगींनी ऐकावे, असे ट्वीट योगींच्या वक्तव्यानंतर खासदार ओवेसींनी केले आहे . आता ओवेसी सभेत योगींना काय उत्तर देतील? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.