Yogi 2.0 : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत इकाना स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला. योगी सरकारच्या मंत्रीमंडळात एकमेव मुस्लिम मंत्री दानिश आझाद अन्सारी आहेत. दानिश अन्सारी हे अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. तसेच अन्सारी हे योगींच्या जवळचे मानले जाते. अन्सारी हे बलियातील वसंतपूर येथे राहणाऱ्या आहेत. अन्सारी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. अन्सारी यांनी सुरुवातीचे शिक्षण बलिया येथून पूर्ण केले. त्यानंतर लखनौ येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अन्सारी यांना राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. यावेळी मोहसिन रजा यांना मंत्रीमंडळात जागा दिली नाही. यंदा दानिश योगी सरकारच्या मंत्रीमंडळातील मुस्लिम चेहरा आहे.
अन्सारी यांना 2017 साली उर्दू भाषा समितीचे सदस्य बनवले होते. 2021 साली त्यांना अल्पसंख्यांक मोर्चाचे महामंत्री म्हणून जबाबदारी दिली. आता त्यांना मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 32 व्या वर्षी ते योगी सरकारच्या कॅबीनेटचा चेहरा आहे. लखनौ विद्यापीठातून त्यांनी बी. कॉम पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मास्टर क्वालिटी मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले आहे.
10 मार्चला आलेल्या निकालानंतर अन्सारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. अन्सारी म्हणाले, "उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हे सिद्ध केले की, आपल्या प्रदेशात जात, धर्म यांच्या पलीकडे जाऊन विकास आणि राष्ट्रवादाला पसंती दिली आहे. या ऐतिहासिक विजयासाठी योगींचे अभिनंदन."
योगींच्या मंत्रिमंडळात कुणाला स्थान -
केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 9 वेळा आमदार राहिलेले सुरेश कुमार खन्ना यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सूर्य प्रताप शाही, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, चौधरी लक्ष्मीनारायण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भुपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभोर, जितेन प्रसाद, राकेश साचेन, जयवीर सिंह, धरम पाल सिंह, नांद गोपाल गुप्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
संबंधित बातम्या :
Yogi Adityanath Oath Ceremony : 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...' योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, दिग्गजांची उपस्थिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha