देशभरात योगचे कार्यक्रम कुठे-कुठे?
मुंबई: मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबतच भाजप नेत्या शायना एनसी यांनी सकाळी 6.30 वा. मरीन ड्राईव्हवर योग केला. यावेळी अरबाज खान, मलायका अरोरा आणि इतरही बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
मुंबई: योग दिनानिमित्त आज आयएनएस विराटवर नौदलाच्या जवानांनी योग केला.
नागपूर: केंद्रीय दळणवळण मंत्री नीतिन गडकरी यांनी नागपूरमधील यशवंत स्टेडियममध्ये योगसाठी हजेरी लावली होती.
दिल्ली: राष्ट्रपती भवनातील आयोजित सामूहिक योग कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं.
श्रीनगर: श्रीनगरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये आज सकाळी 6.30 वाजता योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
जयपूर: राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये योग कार्यक्रमाला हजेरी लावली.
भोपाळ: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भोपाळच्या लाल परेड ग्राऊंडवर सकाळी 6.30 वा योग केला.
पटना: पटनातील कंकडबागमधील शिवाजी पार्कमध्ये 6.30 वा. योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
जम्मू: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सकाळी 5.30 वा योग शिबिरात हजेरी लावली.
मणिपूर: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे मणिपूरमध्ये योग कार्यक्रमात उपस्थित होते.
सिक्कीम: केंद्रीय गृहराज्य मंत्री किरन रिजिजू यांनी गंगटोकमध्ये योग केला.
चंदीगढ: केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी चंदीगढमध्ये योग कार्यक्रमाला हजेरी लावली.
शिमला: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हिमाचल प्रदेशच्या सुजानपूरमध्ये योग कार्यक्रमात योग केला
विशाखापट्टणम: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विशाखपट्टणममध्ये योग केला.
संबंधित बातम्या:
LIVE UPDATE : जगभरात योग दिनाचा उत्साह
LIVE : आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान मोदींचा लखनौत योग