Cyclone yaas Live Updates : 'यास' चक्रीवादळानं धारण केलं अतीतीव्र स्वरुप; वादळाचे अपडेट्स एका क्लिकवर
चक्रीवादळ किनाऱपट्टी भागात पोहोचण्यापूर्वीच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली.
ओडिशामध्ये जगतसिंहपूर, केंद्रपाडा, जाजपूर, भद्रक, मयूरभंज, कटक, ढेंकनाल आणि इतर भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची नोंद करण्यात येणार आहे.
यास चकक्रीवादळाच्या लँडफॉलची प्रक्रिया सुरु. एनडीआरएफ, तटरक्षक दल आणि नौदल सज्ज. ओडिशाच्या किनारी भागात यंत्रणा सज्ज आणि सतर्क
ओडिशातील बालासोरमध्ये मुसळधार
यास चक्रीवादळामुळं पश्चिम बंगाल आणि ओडिशा या भागांमध्ये मोठे परिणाम दिसून येणार आहेत. याच्याच पार्श्वभूमीवर हवाई आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाले आहेत. उड्डाणं रद्द करण्यात आली असून, काही रेल्वेगाड्याही वादळामुळं रद्द करण्यात आल्या आहेत.
ओदिशा : भद्रक जिल्ह्याच्या धामरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 130-140 ताशी वेगाने अतितीव्र 'यास' चक्रीवादळ आज दुपारच्या सुमारास धडकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पश्चिम बंगाल मधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये समुद्रात मोठाल्या लाटा उठण्यास सुरुवात. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
पार्श्वभूमी
मुंबई : 'यास' हे चक्रीवादळ ओडिशामध्ये धडकत असल्यामुळं येथील बऱ्याच भागामध्ये सोसाट्याचे वारे आणि अतीमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ओडिशातील भद्रक जिल्ह्यात वादळचाचे थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. भारतीय हवामान खात्याचे मुख्य संचालक डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी दिलेल्या माहिनुसार मंगळवारीच सायंकाळी या चक्रीवादळानं भीषण स्वरुप धारण केलं. चक्रीवादळ पोहोचण्याच्या सहा तास आधी आणि नंतर या भागामध्ये त्याचे गंभीर स्वरुपाचे परिणाम दिसून येतील अशीही माहिती त्यांनी दिली होती.
चक्रीवादळ किनाऱपट्टी भागात पोहोचण्यापूर्वीच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली. किनारपट्टी भागातून जवळपास 50 हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. यास चक्रीवादळ पारादीपपासून 140 किमी अंतरावर, तर बालासोरपासून 220 किमी अंतरावर. परिणामी इथं 150 किमी प्रतितास इतक्या वेगाहून जास्त सोसाट्याचे वारेही मोठं नुकसान करण्याची शक्यता असल्याचं म्हणत नागरिकांना सावध करण्यात आलं आहे.
मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात सक्रिय असणारं यास हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत ते अतितीव्र श्रेणीपर्यंत (वाऱ्यांचा वेग अंदाजे ताशी 165 किमी) पोहोचलं असून. दुपारच्या सुमारास ते ओडिशातील बालासोरजवळ किनारपट्टी ओलांडेल असंही आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -