Delhi Wrestlers Protest : सध्या देशाची राजधानी दिल्लीत भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात देशातील कुस्तीपटू आंदोलन करतायत. सरकार त्यांचं म्हणणं ऐकत नाही असं कुस्तीपटूंचं म्हणणं आहे. ब्रिजभूषण सिंग यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केले असून तक्रारी करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा त्यांचा आरोप आहे. आता शेतकरी नेते राकेश टिकैतही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आज (28 एप्रिल) चालू असलेल्या कुस्तीपटूंच्या निषेधाचं पूर्ण समर्थन केलंय. ममता बॅनर्जींनी आवाहन केलंय की दोषींना त्यांच्या राजकीय पठिंब्याची पर्वा न करता कायद्याच्या कचाट्यात आणण्याची गरज आहे. 


राकेश टिकैत यांनी खेळाडूंच्या समर्थनार्थ ट्वूट करत लिहिलंय, "ज्या कुस्तीपटूंनी देशासाठी पदक जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, त्यांच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे. आजच्या युगात जो हसतो तो गरजेच्या वेळी इतरांना उपयोगी पडतो. जो न घाबरता सत्य बोलतो तो एक उत्तम पैलवानही असतो."


 






दुसरीकडे ममत बॅनर्जी ट्वीट करत लिहितात की , "आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे. ते एका आवाजात सोबत न्यायासाठी बोलतायत. आमचे खेळाडू हे आपल्या देशाचे अभिमान आहेत. ते चॅम्पियन आहेत," असं त्यांनी ट्वीट केलंय. "दोषींना त्यांच्या राजकीय संबंधांची पर्वा न करता कायद्याच्या कचाट्यात आणलंच पहिजे. न्यायाचा विजय झालाच पाहिजे. सत्याचा विजय झालाच पाहिजे," असंदेखील ममता बॅनर्जींनी लिहिलंय. 


 






तर आजच दिल्ली पोलिसांनी सुप्रिम कोर्टाला कळवलं आहे की आजच या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येईल. 


 






निरज चोप्रानेदेखील ट्वीट करत या आंदोलनाला समर्थन दिलंय. नीरज चोप्रानं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "एक राष्ट्र म्हणून प्रत्येक माणसाची अखंडता आणि प्रतिष्ठेचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. जे घडत आहे ते कधीच घडू नये. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तो निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं हाताळला गेला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा." 


 






भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा हिनेदेखील महिला कुस्तीपटूंच्या समर्थनात ट्वीट केलंय. 






नेमके आरोप काय? 


सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह शरण सिंह यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला आहे. अनेकदा तक्रार करूनही समिती त्यांचे ऐकत नसल्याचं पैलवानांचं म्हणणं आहे. परिणामी पैलवान रस्त्यावर उतरुन आंदोलन करतायत. याप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी (26 एप्रिल) सांगितलंय की, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळाच्या आरोपांवर एफआयआर नोंदवण्यापूर्वी प्राथमिक चौकशीची गरज आहे. यावर सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी घेण्याचे सांगितले आहे. 

महत्वाच्या बातम्या : 


Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु