Chardham Yatra Alert: चारधाम यात्रेदरम्यान, हवामान खात्याने (IMD) उत्तराखंड (Uttarakhand) मधील चार जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमधील जिल्ह्यांमध्ये पाच दिवस हिमस्खलनाचा (Avalanches) इशारा दिला आहे. यासोबतच प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh), दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गुजरात (Gujarat) आणि देशातील (India) इतर राज्यांतून येणाऱ्या यात्रेकरूंना उत्तराखंडच्या हवामानाची माहिती (Weather of Uttarakhand) घेऊनच प्रवास सुरू करण्याचे आवाहन केले गेले आहे.


यमुनोत्रीमध्ये दिवसभर अधूनमधून बर्फवृष्टी सुरूच आहे. त्यातच गंगोत्रीच्या उंच शिखरांवर पुन्हा हिमवृष्टी आणि धाममध्ये पाऊस झाल्याची माहिती मिळते आहे. केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने रुद्रप्रयाग (Rudraprayag) जिल्हा प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. धाम परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, त्यामुळे तापमानातही घट झाली आहे. 


हिमल्खलनाच्या इशाऱ्यामुळे रस्त्यावरुन प्रवास करणे यात्रेकरुंसाठी धोकादायक ठरू शकते. या कारणास्तव, हवामान खात्याने नवीन इशारा (New Alert) जारी करताना प्रवाशांना जिथे आहात तिथेच थांबण्याचे आवाहन केले आहे. हवामानाची माहिती (Weather Update) मिळाल्यानंतरच पुढील प्रवास करण्याचे सुचवले आहे.


याआधीही जारी करण्यात आला होता अलर्ट


चारधाम यात्रेच्या सुरुवातीलाच, म्हणजेच मंगळवारीही हवामान खात्याने बर्फवृष्टी आणि हिमस्खलनाचा इशारा दिला होता. उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी आणि हिमस्खलनाचा इशारा दिल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने गोमुख ट्रॅकवर आठवडाभर बंदी घातली होती. यासोबतच सरकारही अलर्ट मोडवर आले आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात कोणत्याही पर्यटकाला साहसी खेळ किंवा ट्रेकिंग करू न देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.


बर्फवृष्टी आणि हिमस्खलनाचा इशारा


उत्तरकाशी जिल्ह्यात आणखी काही दिवस बर्फवृष्टी आणि हिमस्खलन होण्याचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभमूीवर गंगोत्री राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने उत्तरकाशीचा गोमुख ट्रेक पुढील एक आठवड्यासाठी बंद केला आहे. गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक रंगनाथ पांडे यांनी यासाठी आदेश जारी केले आहेत. जेव्हा हवामान अनुकूल असेल तेव्हाच पर्यटकांना गोमुखाकडे जाण्यास परवानगी दिली जाईल, असे आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे बर्फवृष्टीमुळे चारधाम यात्रेला आलेल्या एकाही भाविकाला गोमुखात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Badrinath Dham: जय बद्री विशाल! सहा महिन्यांनी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, 15 क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट