नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज जागतिक वडापाव दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या वडापावची भुरळ दिल्लीकरांनाही पडली आहे. दिल्लीत तब्बल 144 फूट लांब वडापाव तयार करण्यात आला आहे.



हा जगातला सर्वात मोठा वडापाव आहे. या वडापावची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. दिल्लीतल्या स्ट्रीट फूड चेननं हा कार्यक्रम आयोजित केला होता.

 

२३ ऑगस्ट २००१ ला धीरज गुप्ता या व्यक्तीने जम्बो वडापावचा बिझनेस सुरू केला. त्यानंतर त्यांच्या ९ शहरातल्या आऊटलेटनी हा वर्ल्ड वडापाव डे सुरू केला. आज दिल्लीत वाटिका बिझेनस पार्क या ग्रुपच्या नुक्कडवाला या स्ट्रीट फूड चेननं हा कार्यक्रम आयोजित केला.