मुंबई : नेस्ले कंपनीची प्रसिद्ध मॅगी नूडल्स पुन्हा एकदा नंबर वन ठरली आहे. मागील वर्षी मॅगीवर शिसं जास्त असल्याच्या कारणावरून अन्न आणि औषध प्रशासनाने बंदी आणली होती. जवळपास 5 महिन्यांनी पुन्हा नव्याने बाजारात आलेल्या मॅगीने आपला जम बसवला आहे.

 

नोव्हेंबर 2015 मध्ये पुन्हा बाजारात आलेल्या मॅगीचा मार्केट शेअर 11 टक्के होता. डिसेंबरमध्ये मार्केट शेअरमध्ये मॅगीने 35 टक्क्यांपर्यंत मजल मारली होती. मार्च 2016 पर्यंत बाजारातील शेअरमध्ये 51 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. आता मॅगीचा बाजारातील हिस्सा 57 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

 

नेस्लेने मॅगीच्या चार व्हेरिएंट्सना बाजारात उतरवलं आहे. ज्यात मॅगी कप्पा नूडल्स आणि मॅगी हॉटहेड्सचा समावेश आहे. सोबतच मॅगीने नो ओनियन, नो गार्लिक नूडल्सही बाजारात आणल्या आहेत.

 

18 ऑगस्ट रोजी नेस्लेने आपले बाजार समभाग जाहिर करुन पुन्हा मॅगी खवय्यांच्या पसंतीस उतरल्याचं स्पष्ट केलं आहे.