बेळगाव : प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध पतीला कळल्याने विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं. प्रियकरासोबत झाडाला गळफास लावून विवाहितेने आत्महत्या केली.

खानापूर तालुक्यातील गुंजीजवळील वडागावत अत्यंत खळबळजनक घटना घडली. प्रियकरासोबत असलेले अनैतिक संबंध पतीला समजल्याने एका विवाहितेने प्रियकरासह झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

निर्मला (32) आणि विशाल (26) अशी आत्महत्त्या केलेल्याची नाव आहेत ते दोघेही गुंजी वडगाव निवासी आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला आणि विशाल यांचं एकमेकांवर प्रेम होते दोघांतील अनैतिक संबंध निर्मलाच्या पतीला समजल्यावर दोघांच भांडण झालं. यानंतर विशाल आणि निर्मला दोघांनी गुंजी येथील शेतात गळफास लाऊन आत्महत्या केली. खानापूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.