नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या युगात काहीही होऊ शकतं, असं अनेकदा म्हटलं जातं. पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आली आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एका महिलेने ट्विटरवरुन गळ्यातल्या स्टोलची मागणी केली आणि काही तासातच पार्सल घरी पोहोचलं.

पंतप्रधान मोदींनी महाशिवरात्रीच्या दिवशी कोईम्बतूर इथे 112 फूट उंच शंकराच्या मूर्तीचं अनावरण केलं. त्यावेळी मोदींच्या गळ्यात खास स्टोल होता. त्या स्टोलची मागणी शिल्पी तिवारी यांनी केली.

https://twitter.com/shilpitewari/status/835126585804144640

शिल्पी यांना विश्वास बसणार नाही, अशी गोष्ट दुसऱ्याच दिवशी घडली. पंतप्रधान मोदींच्या स्वाक्षरीसह दुसऱ्या दिवशी स्टोल घरी पोहचवण्यात आला. त्यानंतर शिल्पी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

https://twitter.com/shilpitewari/status/835439848592814081

मोदींनी दिलेल्या आशीर्वादाने भारावून गेले आहे. मोदी दररोज हजारो मैल प्रवास करतात, पण तरीही आपल्याकडे त्यांचं लक्ष असतं, असं म्हणत शिल्पी यांनी आनंद व्यक्त केला.