नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान शुक्रवारी रात्री 60 तासांच्या नंतर भारतात परतले. अटारी वाघा बॉर्डरवरुन त्यांना वायुसेनेने हेलिकॉप्टरने दिल्लीत आणले आहे. आज अभिनंदन यांना वायुसेनेच्या नियमांनुसार 'डीब्रिफिंग' आणि 'बग स्कॅनिंग' चा सामना करावा लागणार आहे. यामध्ये सेना आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी त्यांची चौकशी करणार आहे. यानंतर त्यांचे मेडिकल चेकअप होईल.
VIDEO | तब्बल 60 तासांनी भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी | एबीपी माझा
भारतीय वायुसेनेच्या नियमानुसार कमांडर अभिनंदन यांना काही कठीण परीक्षांमधून जावे लागणार आहे. वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनंदन यांना भारतात वापसीनंतर काही परीक्षांचा सामना करावा लागणार आहे. हे खरतर चांगलं वाटत नाही मात्र, भारतीय वायुसेनेचे नियम आणि कायदे कडक आहेत. अशा प्रकारे दुसऱ्या देशात पकडल्यानंतर आपल्या देशात आल्यावर या टेस्टचा सामना करावाच लागतो. याला अन्य कुठलाही पर्याय नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या गोष्टींचा अभिनंदन यांना करावा लागणार सामना
- आज, शनिवारी त्यांच्याशी डीब्रिफिंग होईल. यावेळी वायुसेनेचे अधिकारी त्यांच्याशी पाकिस्तानात घालवलेल्या वेळेबद्दल विचारपूस करतील. वायुसेनेच्या इंटेलिजन्सची ही डीब्रीफिंग खूप त्रासदायक असते. वायुसेनेच्या नियमांनुसार हे अनिवार्य असते. यामध्ये दुष्मनांनी पकडलेल्या जवानांकडून कैदेत असताना काही माहिती दिली आहे का? दुष्मनांच्या सेनेने त्यांना त्यांच्या सैन्यात सामावून तर घेतले नाही ना? या गोष्टींवर बारकाईने विचारपूस केली जाते.
- यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांना काही मेडिकल टेस्टचा सामना करावा लागेल, ज्यामध्ये पूर्ण बॉडी चेकअप देखील होईल.
- यानंतर अभिनंदन यांची स्कॅनिंग होईल. ज्यामध्ये पाकिस्तानी आर्मीने काही 'बग' फिट केला आहे का? याबद्दल तपासलं जाईल.
- यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांची सायकॉलॉजिकल टेस्ट देखील होईल. यामध्ये त्यांची मानसिक स्थिती कशी आहे? याची माहिती काढली जाईल.
- यानंतर विंग कमांडर यांच्याशी इंटेलिजेंस ब्यूरो (IB)आणि रिसर्च अँड अनॅलिसिस विंग (RAW) सुद्धा चौकशी करेल.
भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी
भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले आहेत. तब्बल 60 तासांच्या प्रतीक्षेनंतर अभिनंदन मायदेशी डेरेदाखल झाले. अभिनंदन यांच्या पुनरागमनानंतर वाघा बॉर्डरवर एकच जल्लोष झाला. 'भारत माता की जय'च्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.
पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर तीन दिवसांच्या आत अभिनंदन यांचं भारतात प्रत्यावर्तन करण्यात आलं. त्यांना पाकिस्तानकडून भारताकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेला काहीशी दिरंगाई झाली. तरीही, भारताच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान प्रत्यावर्तन मानलं जात आहे.
मायदेशी परतल्याचा मोठा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनंदन यांनी दिल्याची माहिती अमृतसरमधील अधिकाऱ्यांनी दिली. वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन वर्धमान हे मायदेशी परत आले. भारतात परतण्यापूर्वी त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या.
VIDEO | वायूसेनेच्या एअर स्ट्राईकवर शरद पवारांकडून सरकारला सवाल | अकलूज | एबीपी माझा