Heavy Rain in Delhi : गेल्या आठवडाभरापासून प्रचंड उन्हामुळे होरपळलेल्या दिल्लीकरांची पहाट सुखद गारव्याने झाली. सुसाट वादळी वाऱ्यासह  ढगांचा गडगडाट दिल्लीत जोरदार पाऊस झाला. उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळाला असला तरी  या पावसामुळं काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे वीजपुरवठा देखील खंडित जाला आहे. तसेच विमानांच्या उड्डांनावरही या स्थितीचा परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजीही दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. 


वाहतुकीवर परिणाम 


दिल्लीत सोसाट्याचा वाऱ्यामुळे काही भागात झाडे उन्मळून पडली आहेत. रस्ते बंद झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, आज दिल्लीत कमाल तापमान 39 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. गडगडाटासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. मंगळवारीही असेच वातावरण राहणार आहे. दुसरीकडे, बुधवार ते शनिवारपर्यंत आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारपासून हवामान निरभ्र होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 42 आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.




90 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण दिल्ली आणि एनसीआरच्या लगतच्या भागात  90 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. खराब हवामानासह  पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम दिल्ली विमानतळावरही झाला आहे. प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. दिल्ली एनसीआर तसेच लगतच्या भागात 60 ते 90 किमी प्रतितास वेगाने वारे आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे. 




दिल्ली NCR व्यतिरिक्त या भागात जोरदार वारे आणि पाऊस अपेक्षित 


लोनी देहत, हिंडन एअरफोर्स स्टेशन, बहादुरगड, गाझियाबाद, इंदिरापुरम, छपराला, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, मानेसर, रेवाडी, पलवल, बावल, नूह, औरंगाबाद, सिकंदराबाद, चंदौसी, बुलंदशहर, जहांगीराबाद, बहाजुहराबाद , बरेली, शिकारपूर, खुर्जा, पहारू, देबाई, नरोरा, गभना, सहसवान, जट्टारी, अत्रौली, खैर, अलीगढ, कासगंज, नांदगाव, इग्लास, सिकंदर राव, बरसाना, राया, हाथरस.
संपूर्ण दिल्ली व्यतिरिक्त, यमुनानगर, कुरुक्षेत्र, कर्नाल, राजौंड, असंध, सफिदोन, जिंद, पानिपत आणि त्याच्या लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.