नवी दिल्ली : हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि 'बिग बॉस 11'ची स्पर्धक सपना चौधरीने काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. मात्र एबीपी न्यूजकडे असा पुरावा आहे की, ज्यामुळे सिद्ध होतं की 23 मार्च रोजी सपना चौधरीने औपचारिकरित्या काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. एवढंच नाही तर राज बब्बर यांचे सहकारी आणि यूपी काँग्रेस संघटनेचे मंत्री नरेंद्र राठी यांनीही एबीपी न्यूजला सांगितलं होतं की, "23 मार्च रोजी संध्याकाळी सपनाने बहिणीसोबत काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं." मात्र हे वृत्त फेटाळण्याबाबत विचारलं असता सपनाने 'नो कमेंट' म्हणत उत्तर देणं टाळलं.

राजकारण, समाजकारण आणि सिनेमा

राज बब्बर यांचं ट्वीट
उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनीही ट्वीट करुन सपनाचं काँग्रेसमध्ये स्वागत केलं होतं. राज बब्बर यांनी ट्विटरवर सपना आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा एक फोटो शेअर करुन लिहिलं होतं की, "सपना चौधरी यांचं काँग्रेस कुटुंबात स्वागत."


काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोट्या, डान्सर सपना चौधरीकडून स्पष्टीकरण

सपना चौधरी खोटं का बोलत आहे?
एबीपी न्यूजकडे सपना चौधरी यांनी काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारल्याचा फॉर्म आहे. मात्र काँग्रेसमध्ये सामील झाल्याचं वृत्त सपना चौधरी का फेटाळत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.



सपना चौधरीने काल (24 मार्च) यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त फेटाळलं. तसंच सदस्यत्व स्वीकारताना काढलेला फोटा जुना असल्याचं तिने सांगितलं. "मी सध्या दुसऱ्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे मी सध्या कोणत्याही पक्षात सामील होत नाही. तसंच भविष्यात कोणत्याही पक्षात सामील होण्याची बातमी सर्वात आधी मीडियाला देईन. तसंच भविष्यात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही इरादा नाही," असंही ती म्हणाली.

मागील वर्षी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागण्यासाठी सपना चौधरी काँग्रेस कार्यालयात पोहोचली होती, तेव्हा तिच्या आणि काँग्रेसच्या कनेक्शनची चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर तिने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचं कौतुक केलं होतं.

भाजप आमदाराचं सोनिया गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य, सोनिया गांधींची सपना चौधरीशी तुलना

VIDEO : काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोट्या : सपना चौधरी