मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड स्टार सलमान खानच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली जात आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र होते म्हणूनच त्यांची हत्या केल्याचं बिष्णोई गँगने स्पष्ट केलंय. त्यामुळे आता सलमानच्या जीवालाही धोका वाढल्याने पोलिसांचे टेन्शन अधिकच वाढल्याचं दिसतंय. लॉरेन्स बिष्णोई गँग आणि सलमान खान यांच्यामधील वादाला कारणीभूत हे काळ्या हरणाची म्हणजे काळविटाची शिकार आहे. या प्रकरणात सलमान खानला पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती.


Why Lawrence Bishnoi Want To Kill Salman Khan : सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोईचे वैर का? 


सलमान खान आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगमध्ये 1998 साली वैर सुरू झालं. राजस्थानमध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं आणि त्या दरम्यान सलमान खानने दोन काळविटांची शिकार केली. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर प्रतिबंध असताना सलमानने हे कृत्य केल्याने तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. या प्रकरणी खटला चालून 2018 साली सलमान खानला पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. पण दोनच दिवसात तो 50 हजारांच्या जामीनावर बाहेर आला. यामुळे लॉरेन्स बिष्णोई गँग मात्र सलामान खानवर प्रचंड नाराज झाली. 


Bishnoi Community Blackbuck Relation : बिष्णोई समाजात काळ्या हरणाची पूजा 


राजस्थानमधील बिष्णोई समाज हा निसर्गदेवतेला पूजणारा समाज मानला जातो. वृक्षतोड असो वा इतर पर्यावरणीय वाद असो, शेकडो वर्षांपासून हा समाज निसर्गाचा आदर करतो आणि त्याच्या विरोधातील कृत्यांच्या विरोधात ठामपणे उभा राहतो. 


काळे हरिण हे बिष्णोई समाजात पवित्र मानले जाते, त्याला देवाचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे सलमानने दोन काळ्या हरिणांची हत्या केल्यानंतर माफी मागावी अशी मागणी लॉरेन्स बिष्णोई यांने केली होती. पण सलमान खानने माफी मागितली नाही आणि त्यामुळेच लॉरेन्स बिष्णोई त्याच्या जीवावर उठला आहे. 


सलमानला जीवे मारण्याची धमकी


लॉरेन्स बिष्णोई यांने सलमान खानला अनेकदा उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्याच्या परिवारालाही जीवे मारायची धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सलमानच्या घरावर गोळीबारही केला होता.


काळ्या हरणाच्या शिकारीप्रकरणी सलमान खानला त्याचे मित्र बाबा सिद्दीकी यांनी मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सलमान खानला मदत करणाऱ्यांना मारले जाईल असं सांगत बिष्णोई गँगने बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या केल्याचं सांगितलं जातंय. 


Bishnoi Community History : बिष्णोई समाजाचा इतिहास काय? 


बिष्णोई समाज हा पर्यावरणाचा, वन्यप्राण्यांचा रक्षक म्हणून ओळखला जातो. राजस्थानमधील जोधपूर, नागोर, बिकानेर, जैसेलमेर या जिल्ह्यांमध्ये बिष्णोई समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्येही हा समाज वास्तव्यास आहे. 18 व्या शकता जोधपूरच्या राजाने त्याचा महल बनवण्यासाठी झाडे तोडण्याचा आदेश त्याच्या सैनिकांना दिला होता. राजाच्या या आदेशाच्या विरोधात 84 गावांतील बिष्णोई समाजानं मोठं आंदोलन केलं. या लोकांनी झाडांना मिठ्या मारल्या आणि त्यासोबत सैनिकांच्या कुऱ्हाडींचा घाव आपल्या अंगावर घेत जीवही दिला. या आंदोलनात जवळपास 350 बिष्णोई लोकांचा जीव गेला.


ही बातमी वाचा: