मुंबई : भारतातून युरोप वा अमेरिकेसारख्या देशात जाऊन काम करण्याची आणि तिथे स्थायिक होण्याची अनेकांची इच्छा असते. पण सगळ्यांनाच व्हिसा (Foreign Visa) मिळतो असं नाही. सहजासहजी व्हिसा मिळाला तर ठिक, नाहीतर ते मिळवण्यासाठी लोक कोणत्याही टोकाला जातात. अनेकजण तर त्यासाठी खोटं लग्नही करण्याचं नाटक करतात. व्हिसासाठी करण्यात येणारं बनावट लग्न कसं असतं आणि जर असा व्हिसा मिळाला तर त्याचा फायदा काय होतो हे आपण पाहूयात.
व्हिसासाठी करण्यात येणारं खोटे लग्न म्हणजे काय?
जेव्हा व्हिसा मिळविण्यासाठी दोन लोक ठरवून एखादा करार करतात आणि विवाह करण्याचं नाटक करतात तेव्हा त्याला बनावट विवाह म्हटलं जातं. या लग्नात दोन व्यक्ती एकमेकांसोबत आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याच्या उद्देशाने लग्न करत नाहीत, तर कुठूनतरी बनावट विवाह प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
कोणत्या देशांमध्ये जोडीदारासोबत काम करण्याची परवानगी आहे?
कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नेदरलँड, फिनलंड आणि न्यूझीलंड सारखे देश जोडीदार आणि भागीदारांना त्या देशात काम करण्याची परवानगी देतात. तर हाँगकाँग आणि यूएस सारखे देश फक्त विवाहित जोडीदारांना काम करण्याची परवानगी देतात.
कोणते फायदे मिळतात?
CR1 व्हिसा दोन वर्षांसाठी वैध आहे. व्हिसाधारकाने ग्रीन कार्डसाठी असलेल्या अटी काढून टाकण्यासाठी, तो कायमस्वरूपी आणि 10 वर्षांसाठी वैध करण्यासाठी अर्ज करावा लागेल. 10 वर्षांच्या कालावधीनंतर तुम्ही नवीन व्हिसासाठी अर्ज करू शकता.
खरं तर काही देशांमध्ये फॅमिली व्हिसा सहज उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत लोक यासाठी बनावट लग्न देखील करतात. जे देश सहजपणे फॅमिली व्हिसा देतात त्यात पोर्तुगाल, सायप्रस, ग्रीस, मॉन्टेनेग्रो आणि माल्टा यांसारख्या देशांचा समावेश होतो. यूएस मध्ये अँटिग्वा आणि बार्बुडा, मेक्सिको, बेलीझ आणि निकाराग्वा येथे तुम्हाला फॅमिली व्हिसा सहज मिळू शकतो. कंबोडिया, मलेशिया आणि थायलंड हे आशियाई देश जिथे निवासी व्हिसा मिळणे सोपे आहे.
त्या देशातील मुलाशी किंवा मुलीशी विवाह केल्यावर व्हिसा मिळतो
अनेक देशांमध्ये त्या देशाचा रहिवासी असलेल्या मुली किंवा मुलाशी लग्न करूनही व्हिसा मिळणे सोपे आहे. लोभामुळे अनेक लोक पैसे देऊन त्या देशातील रहिवाशाशी बनावट विवाह करतात. मात्र अनेक देशांमध्ये अशी खोटी प्रकरणे समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाते.
ही बातमी वाचा: