मुंबई : अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढून स्वत: नग्न होणे, हा बलात्काराचा प्रयत्न (Rape Attempt) नाही, असं राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajasthan High Court) म्हटलं आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय देताना, अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वत: नग्न होणे या कृतीला वेगळा गुन्हा ठरवलं आहे. न्यायमूर्ती अनूप कुमार धांड म्हणाले की, हा बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा नाही.अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढणे हा बलात्काराचा प्रयत्न (Attempt to Commit Rape) मानता येणार नाही. त्याऐवजी, भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अन्वये हा महिलेचा अपमान आहे आणि कलम 376/511 अंतर्गत बलात्काराचा प्रयत्न नाही.

Continues below advertisement

मुलीची अंतर्वस्त्र काढून स्वतः नग्न होणे, बलात्काराचा प्रयत्न नाही

अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढून स्वत: नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही, असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने एका 33 वर्ष जुन्या प्रकरणात न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढणे, हा बलात्काराचा प्रयत्न मानता येणार नाही, असं राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ही कृती भारतीय दंड संहितेच्या कलम 376/511 अंतर्गत बलात्काराचा प्रयत्न नसून, कलम 354 अन्वये हा स्त्रीच्या प्रतिष्ठेविरुद्ध गुन्हा आहे, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

हा स्त्रीच्या प्रतिष्ठेविरुद्ध गुन्हा

मुलीची अंतर्वस्त्रे काढून पूर्णपणे नग्न होणे हा आयपीसीच्या कलम 376 आणि कलम 511 नुसार गुन्हा नाही, असं राजस्थान उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती अनुप कुमार धांड यांनी म्हटलं आहे की, हा बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा नाही. बलात्काराचा प्रयत्न म्हणजे आरोपीने तयारीनंतर पाऊल उचलणे. मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वतः नग्न होणे, स्त्रीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी ही बाब असून आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत दंडनीय असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?

तक्रारीनुसार, मुलगी एका वॉटर बूथवर पाणी पीत होती तेव्हा आरोपी तिच्यावर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तिला जबरदस्तीने जवळच्या धर्मशाळेत घेऊन गेला. यावेळी आरोपीने स्वतःचे आणि पीडितेचे कपडे काढले. मात्र, मुलीने आरडाओरड करताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिची सुटका केली. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. हे प्रकरण 11 वर्षांपूर्वीचं असून आरोपी त्यावेळी 25 वर्षांचा होता आणि पीडिता 6 वर्षांची होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

माता न तूं वैरिणी! आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ