नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वात मोठा धक्का जर कोणाला बसला असेल तर तो काँग्रेसला. कारण काँग्रेसला आसाम आणि केरळ या दोन्ही राज्यातली सत्ता गमवावी लागली आहे. तर तिकडे भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

 

आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. तामिळनाडूच्या मतदारांनी यावेळी धक्कादायक निकाल दिलाय. जयललिता सलग दुसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनणार आहेत. तर करुणानिधीच्या द्रमुकनं गेल्या निवडणुकांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. केरळच्या सत्तेच्या दोऱ्या डाव्यांच्या हातात आल्या आहेत.. फक्त पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला यश मिळालं आहे.

 

पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी पुन्हा एकदा एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 27 मेला त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

------------

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल हाती येत आहेत. या पाच राज्यात कोण सत्ता मिळवणार आणि कोण टिकवणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

 

LIVE: सर्बानंद सोनोवाल आसामचे मुख्यमंत्री बनणार

-------------------------

BREAKING - आसामच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपची सत्ता, भाजपला 70 जागांची आघाडी



BREAKING - प. बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींना पसंती, तृणमूल 216 जागांवर पुढे


BREAKING - तामिळनाडूमध्ये पुन्हा जयललितांना बहुमत, अण्णा द्रमुक 123 जागांवर पुढे

BREAKING - केरळमध्ये डाव्यांची पुन्हा एण्ट्री, डावी आघाडीला 78 जांगावर बहुमत

 

-------------------------

पश्चिम बंगाल कल (294)  : ममता+217, डावे+65, भाजप 8, इतर 4


 

तामिळनाडू कल (234)  : जयललिता 120,  करुणानिधि+ 81, भाजप+ 1, इतर 1

 

केरल कल (140) : काँग्रेस+51, डावे+ 80, भाजप+ 1, इतर 8

 

आसाम कल (126) : भाजप+ 78, काँग्रेस 23, AIUDF 14 , इतर  7

 

पुदुच्चेरी कल  (30) : कँग्रेस+ 8, AINRC 12, जयललिता 1, इतर 1

 

-------------------------

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठी आघाडी,  ममतांना 200 हून अधिक जागांवर आघाडी, कल : ममता 204 , डावे+काँग्रेस 66, भाजप 08, इतर 05

----------------------

आतापर्यंतचे कल -
*प. बंगाल - ममतांचं वर्चस्व कायम
*आसाम - भाजप बहुमताजवळ, पहिल्यांदाच सत्ता स्थापनेच्या मार्गावर
*तामिळनाडू - चुरशीच्या लढाईत जयललिता आघाडीवर
*केरळ - सत्ताधारी काँग्रेस पिछाडीवर, डावे सत्तेजवळ

---------------------------

प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींना बहुमत, तृणमूल 159 जागांवर आघाडीवर

---------------------------

प. बंगाल : (294) - ममता - 144 , डावे+काँग्रेस 75, भाजप 04, इतर 03



भाजप उमेदवार आणि क्रिकेटर एस श्रीशांत तिरुअनंतपुरममधून पिछाडीवर



---------------------------

पुदुच्चेरी कल (19/30) : काँग्रेस+15, AINRC 4, AIDMK 0, इतर 0

---------------------------

तामिळनाडू कल (180/234) : जयललिता 102, करुणानिधी 77, भाजप+ 1, इतर 0

---------------------------

केरळ कल (139/140) : काँग्रेस+ 52, डावे+ 78, भाजप+ 2, इतर 7

---------------------------


आसाम कल (90/126) : भाजप+ 57,  काँग्रेस+ 19, AIUDF+ 12, इतर+ 2

---------------------------

प. बंगाल कल (250/294)  : ममता 171, डावे+ 68,  भाजप 8, इतर 3

---------------------------

#ABPResults - आसाममध्ये भाजपला मोठी आघाडी

---------------------------

आसाममध्ये काँग्रेस 3 , भाजप 9 जागांवर आघाडीवर

---------------------------

केरळात डाव्यांना तब्बल 40 जागांवर आघाडी

---------------------------

केरळात डावे 6, काँग्रेसला 1 जागेवर आघाडी

---------------------------

केरळात डाव्यांनी खातं उघडलं

---------------------------

मुंबई : अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांचा निकाल थोड्या वेळात जाहीर होणार आहे. पाचही राज्यात भाजपचं सरकार नसल्याने भाजपसमोर एक मोठं आव्हान आहे.

 

 

सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व राज्यांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोल


विविध न्यूज चॅनेलच्या एक्झिट पोलनुसार, आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार येण्याची शक्यता आहे, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आपला गड कायम राखणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

तामिळनाडूमध्ये जयललितांच्या अण्णा द्रमुक आणि एम. करुणानिधींच्या द्रमुक या पक्षांमध्ये सत्तेसाठी कडवी झुंज रंगणार आहे. तर केरळमध्ये डावी आघाडी काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला सत्तेवरुन खाली खेचण्याची शक्‍यता आहे.

 

संबंधित बातम्या :


आसाममध्ये कमळ फुलण्याची शक्यता, बंगालमध्ये दीदींची जादू कायम?