भोपाळ : मध्य प्रदेशच्या एका नेत्याने दिल्ली-मुंबई हायवेवरच (Delhi Mumbai Expressway) गर्लफ्रेन्डसोबत संबंध ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल (Manohar Lal Dhakad Video)  झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मनोहरलाल धाकड असं त्या नेत्याचं नाव असून तो भाजपशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु भाजपने लगेचच तो आपल्या पक्षाचा नेता नसल्याचं जाहीर केलं. मनोहरलाल धाकडची पत्नी ही मंदसोर जिल्हा पंचायतीची भाजप समर्थित सदस्या आहे. 

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील भानपुराजवळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये मनोहरलाल धाकड हा नेता त्याच्या गाडीतून उतरतो आणि त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत रस्त्यावरच शारिरीक संबंध ठेवतो. असे एकूण दोन वेळा तो शारिरीक संबंध ठेवताना दिसतो. हा व्हिडीओ 13 मे रोजीचा असल्याचं सांगितलं जातंय. 

Who Is Manohar Lal Dhakad : कोण आहे मनोहरलाल धाकड? 

मनोहरलाल धाकड हा मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील बनी गावचा रहिवासी आहे. त्याची पत्नी ही जिल्हा पंचायत सदस्या आहे. मंदसोर जिल्हा पंचायतीच्या वार्ड क्रमांक 8 मधून ती भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आली आहे. 

Mandsaur BJP Leader Video Viral: भाजपने हात झटकले

मनोहरलाल धाकड हा भाजपचा नेता असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मनोहरलाल धाकड हा भाजपचा प्राथमिक सदस्यदेखील नाही. पण ऑनलाईनच्या माध्यमातून त्याने भाजपचे सदस्यत्व घेतलंय का याची माहिती नसल्याचं मंदसोरचे भाजप जिल्हाध्यक्षांनी सांगितलं. 

Manohar Lal Dhakad Viral Video : धाकडला पदावरुन हटवण्यात आलं

मनोहरलाल धाकड हा धाकड युवा महासभेचा राष्ट्रीय मंत्री होता. त्यानंतर त्याला या पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा धाकड महासभेने केली आहे. मनोहरलाल धाकडचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

मनोहरलाल धाकडचा या व्हिडीओसंदर्भात भानपुरा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 296 285 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. 

 

ही बातमी वाचा: