Lieutenant Chetna Sharma: प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जगाने दिल्लीतील कर्तव्यपथवर भारताचे लष्करी सामर्थ्य पाहिले आणि त्यासोबतच स्त्रीशक्तीही पाहिली. लेफ्टनंट चेतना शर्मा (Chetna Sharma) यांनी परेडमध्ये भारतात बनवलेल्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या प्रदर्शनाचे नेतृत्व केले. परेड दरम्यान चेतना शर्मा (Chetna Sharma) आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचे नेतृत्व करत बाहेर पडताच संपूर्ण कर्तव्यपथ टाळ्यांच्या गजरात दुमदुमला.
Lieutenant Chetna Sharma: चेतना शर्मा या एअर डिफेन्स रेजिमेंटमधील अधिकारी
लेफ्टनंट चेतना शर्मा (Chetna Sharma) या एअर डिफेन्स रेजिमेंटमध्ये लष्करी अधिकारी आहेत. देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ड्रोन आणि शत्रूच्या विमानांपासून आकाशाचे संरक्षण करणे हे एअर डिफेन्स रेजिमेंटचे उद्दिष्ट आहे.
Lieutenant Chetna Sharma: राजस्थानच्या आहेत रहिवासी
चेतना शर्मा या एका लहान खेडेगावातून येतात. लेफ्टनंट चेतना शर्मा (Chetna Sharma) या राजस्थानमधील खातू श्याम गावातील रहिवासी आहेत. लहानपणापासूनच त्यांनी सैन्यात करिअर करण्याचे ध्येय ठेवले होते. एनआयटी भोपाळमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, चेतना शर्मा यांनी नागरी सेवा प्रवेश परीक्षेचा प्रयत्न केला, ज्यात त्या 6 प्रयत्नांनंतर पास झाल्या.
Lieutenant Chetna Sharma: अपयशानंतरही खचल्या नाही
नागरी सेवा प्रवेश परीक्षेत 5 वेळा नापास झाल्यानंतर लेफ्टनंट चेतना शर्मा (Chetna Sharma) यांनी सतत प्रयत्न केले. अखेर सहाव्या प्रयत्नात त्यांनी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले. लेफ्टनंट चेतना शर्मा यांना नवी दिल्ली येथे कर्तव्यपथवर प्रजासत्ताक दिन परेड 2023 मध्ये डेअरडेव्हिल्स संघाचा भाग म्हणून मेड-इन-इंडिया आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचे नेतृत्व करताना पाहिले गेले आहे. जेव्हा चेतना शर्मांची परेडसाठी निवड झाली, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, प्रजासत्ताक दिन परेड 2023 मध्ये आपल्या युनिटचे प्रतिनिधित्व करणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक नेटकरी हे चेतना शर्मा यांचे खूप कौतुक करत आहेत.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय सशस्त्र दलाच्या तुकडी कर्तव्यपथवर कूच करत असताना शौर्य आणि शिस्तीचे भव्य दर्शन घडले. कर्तव्यपथचे नाव बदलल्यानंतर ही पहिलीच परेड होती. पूर्वी याचे नाव राजपथ होते. राष्ट्रपती मुर्मू यांनी कर्तव्याच्या कर्तव्यपथवर राष्ट्रध्वज फडकवला. यानंतर राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी देण्यात आली.
इतर महत्वाची बातमी: