नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी काऊन्सिलची आज (गुरुवार) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हॅण्डीक्राफ्टच्या 29 वस्तूंवरील कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. याशिवाय जवळजवळ 49 इतर वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे. येत्या 25 जानेवारीपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
दरम्यान, या सरकारच्या या निर्णयानंतर अनेक वस्तूंच्या किंमतीत बदल होणार आहेत. पाहा जीएसटीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं.
जीएसटी बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
- 20 लीटर पाण्याच्या बाटलीवरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात आलं आहे.
- बायो डिझेल आणि वेगवेगळ्या सेंद्रीय खतांवरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात आलं आहे.
- शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सिंचनासंबंधीच्या काही उपकरणं आणि यंत्रांवरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात आलं आहे.
- कोनमधील मेंहदी आणि चिंच चूर्णावरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 5 टक्के करण्यात आलं आहे.
- हिरे आणि बहुमूल्य धातूंवरील जीएसटी जीएसटी 3 टक्क्यावरुन 0.25 टक्के करण्यात आलं आहे.
- श्रवणयंत्रावर जीएसटी आकारला जाणार नाही.
- रुग्णवाहिकेवर 15 टक्के दराने लावण्यात येणारा सेस हटवण्यात आला.
- सार्वजनिक वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बायो गॅसवरील जीएसटी 28 टक्क्यावरुन 18 टक्के करण्यात आलं आहे.
- जुन्या वाहनांच्या विक्रीमध्ये डिलर मार्जिनवरील जीएसटी 28 टक्क्यावरुन 18 टक्के करण्यात आलं आहे.
- सेवांचा विचार केल्यास सूचना अधिकारच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांना जीएसटी लागू नाही.
- टेलरिंगवरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 5 टक्के करण्यात आलं आहे.
- थीम पार्क, वॉटर पार्क, जॉय राइट, मेरी गो राऊंड, गो कार्टिंग यासावरील जीएसटी 28 टक्क्यावरुन 18 टक्के करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
गणेश मूर्तींवरील जीएसटी पूर्णपणे हटवला, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
तब्बल 49 वस्तूंवरील टॅक्समध्ये कपात, जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत निर्णय
जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीनंतर काय-काय स्वस्त?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2018 10:41 PM (IST)
जीएसटी काऊन्सिलची आज (गुरुवार) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हॅण्डीक्राफ्टच्या 29 वस्तूंवरील कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -