मुंबई : चीनमधून जरी कोरोना महामारीची सुरुवात झाली असली तरी आज जगभरात या रोगाने धुमाकूळ घातलाय. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचे दोन मोठे देश म्हणजे चीन आणि भारत. चीनची लोकसंख्या 150 कोटी तर भारताची 130 कोटी. ज्या देशात कोरोना विषाणूची सुरुवात झाली त्या चीनमध्ये जितकी रुग्णसंख्या होती त्याच्या जवळ भारत पोहोचला आहे. चीनमध्ये रुग्णसंख्या 84 हजार 464 होती तर भारतात आज 82 हजार रुग्ण आहेत

चीनमध्ये 79 हजार 256 लोक बरे झाले आहेत तर 4 हजार 644 लोक मृत्युमुखी पडलेत. आत्ताच्या घडीला फक्त 132 कोरोनाबाधित चीनमध्ये आहेत.  भारतात 27 हजार 969 रुग्ण बरे झाले आहेत तर 2649 मृत्युमुखी पडले आहेत. आत्ताच्या घडीला 51 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित भारतात आहेत. भारतात  गेल्या 10 दिवसांपासून रुग्णसंख्येत दररोज 3 हजारांपेक्षा जास्तने कोरोनाबाधितांची भर पडतेय.

चीनमध्ये पहिल्या रुग्णाची नोंद 31 डिसेंबरला झाली तिथे 80 हजार रुग्ण व्हायला 63 दिवस लागले. त्यानंतर मात्र चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवलं, रुग्ण आणि बळींची संख्या कमी होत गेली.

 भारतात पहिल्या रुग्णाची नोंद 30 जानेवारीला केरळ राज्यात झाली म्हणजे 80 हजार रुग्ण संख्या व्हायला 107 दिवस लागले. आता खरी कसोटी आहे, चीनप्रमाणे आपल्याला कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवणं जमेल का याकडे साऱ्या जगाचं लक्ष.

भारतात कोविडचा पहिला रुग्ण सापडला त्याच्या 74 दिवसांनंतर पहिला बळी गेला. 13 मार्च ते 19 एप्रिल म्हणजे त्यानंतरच्या 38 दिवसात 500 बळी गेले. त्यानंतर 500 ते 1000 बळींचा टप्पा पूर्ण व्हायला 10  दिवस लागले तर 1 हजार ते 1500 बळींचा टप्पा पूर्ण व्हायला ७ दिवस लागले

त्यानंतरच्या 5 दिवसात 1500 ते 2 हजार बळींचा टप्पा तर 2 ते अडीच हजार बळींचा टप्पा 5 दिवसात पूर्ण केला.

रुग्ण चीन भारत मृत चीन भारत
पहिला 31 डिसेंबर 31 जानेवारी पहिला 11 जानेवारी 13 मार्च
1 हजार 25 जानेवारी 30 मार्च 500 6 फेब्रवारी 19 एप्रिल
10हजार 1 फेब्रुवारी 14एप्रिल 1 हजार 11 फेब्रुवारी 29 एप्रिल
20 हजार 4 फेब्रुवारी 23 एप्रिल 1500 15 फेब्रुवारी 5 मे
30 हजार 7 फेब्रुवारी 29 एप्रिल 2 हजार 19 फेब्रुवारी 10 मे
40 हजार 10 फेब्रुवारी 4  मे 2500 24 फेब्रुवारी 14 मे
50 हजार 12 फेब्रुवारी 7 मे 3 हजार 5 मार्च
60 हजार 15 फेब्रुवारी 10 मे 4 हजार 16 एप्रिल
70 हजार 17 फेब्रुवारी 12 मे  
80 हजार 2 मार्च  

(स्त्रोत –WHO आणि JHU)