Whatsapp Down:  जगभरात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा काही वेळासाठी ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा हिरमोड झाला.  व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला असून अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या. 


जगभरात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात काम करेनासे झाले होते. ट्विटर सुमारे सव्वा तास ठप्प होते. सोमवारी सायंकाळी 9.30 वाजता व्हॉट्सअॅपवर अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. युजर्सकडून  डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर फेसबुकच्या वेबसाईटवर यूजर्ससाठी एक मेसेज लिहिला आहे. "काही कारणांमुळे फेसबुक वापरण्यास अडथळा येत आहे. आम्ही यावर काम करत असून लवकरात लवकर समस्या दूर करू. असुविधेसाठी क्षमस्व."


व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची  सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने भारतातील लोक सतत हे  अकाउंट सुरू झाले का याची तपासणी करत होते. भारतात युजर्सची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर  ठप्प झाल्याचा मोठा परिणाम होत आहे. 






एका यूजरने ट्वीटरवर पोस्ट लिहिली आहे की, सोशल नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवर भारतीय वेळेनुसार रात्री 9 नंतर वापरण्यास अडचण येत आहे. वेबसाइट downdetector.in या संकेतस्थळावर वेब सर्व्हिसेस ट्रॅक केल्या जातात. यावर असंख्य यूजर्सनी त्यांनी येणाऱ्या अडचणी लिहित तक्रारी केल्या आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :