तुरुंगात बाबा राम रहीमचा दिनक्रम काय?
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2017 10:46 AM (IST)
तुरुंगात राम रहीमचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरु होईल.
नवी दिल्ली : दोन साध्वींवर बलात्कार केल्या प्रकरणी 20 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आलेल्या बाबा राम रहीमची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. तुरुंगात राम रहीमचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरु होईल. राम रहीमचा दिनक्रम कसा असेल? 4:30 वाजता कैद्यांना उठण्याची सक्ती 5:00 वाजता हजेरीसाठी रांगेत उभं राहणे 5:30 वाजता चहा मिळणार. त्यानंतर व्यायामासाठी मैदानात जमावं लागेल 6:30 वाजता प्रार्थना. वाईट कामांपासून दूर राहण्याची शपथ घ्यावी लागणार. 7:30 वाजता नाश्त्यासाठी रांगेत उभं राहणे 8:30 वाजता कोर्टाने नेमून दिलेलं काम करणं 10:30 वाजता पुन्हा हजेरीसाठी रांगेत उभं राहणे 11:00 वाजता पुन्हा काम करण्यास सुरुवात 12:00 वाजता इतर कैद्यांसह बराकीत यावं लागेल 12:30 वाजता आंघोळीसाठी रांगेत उभं राहणे 1:30 वाजता रांगेत उभं राहून जेवण घेणं आणि इतर कैद्यांसह बसून भोजन 2:00 वाजता जेवणानंतर भांडी जमा करणं. 3:00 वाजेपर्यंत आरामासाठी वेळ 3:30 वाजता चहासाठी रांगेत उभं राहणे 4:00 वाजता जेलमध्ये साफसफाई 5 ते 6:00 वाजेपर्यंत हॉलमध्ये बसून भजन करणं 7:00 वाजता पुन्हा बराकीत नेलं जाणार 8:00 वाजता खाण्यासाठी पुन्हा रांगेत उभं राहणं 9:00 वाजता झोपण्यासाठी बराकीत बंद केलं जाणार काय सामान मिळणार? झोपण्यासाठी आणि जमिनीवर अंथरण्यासाठी पांघरुण पाण्याचा माठ ज्यूटपासून तयार केलेला कैद्यांचा गणवेश बराकीची सफाई करण्यासाठी झाडू खालीलपैकी एका कामाची निवड करावी लागणार सुतारकाम, शिवणकाम, स्क्रीन प्रिंटिंग, रसायन निर्मिती, बागकाम, साबण-फिनाईल तयार करणं, कार्पेट किंवा ब्लॅंकेट शिवणं, टीव्ही किंवा रेडिओ दुरुस्ती डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला सीबीआयच्या विशेष कोर्टाने बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर दोन साध्वींनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. प्रत्येक गुन्ह्यात 10 वर्षे, याप्रमाणे 20 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. शिवाय त्याला 30 लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.