लोकसभेसाठी काय आहे देशाचा मूड ? माझा-सी वोटरचा सर्व्हे
एबीपी माझा वेब टीम | 24 Dec 2018 09:53 PM (IST)
जर देशाच्या पातळीवर विचार केला तर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तरप्रदेशात महाआघाडी झाली तर एनडीएला फटका बसून, त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. तर यूपीएला काहीसा फायदा होणार असल्याचं देशाचा मूड सांगतो.
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपला सपाटून मार खावा लागल्यानंतर आम्ही देशाचा मूड जाणून घेतला. यात महाराष्ट्राचा मूड जाणून घेताना शिवसेना-भाजप वेगळे लढले तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर आघाडीच्या जागा लक्षणीयरित्या वाढणार असल्याचं मूड सांगतोय. त्याचवेळी शिवसेना भाजप युती झाली तर मात्र आघाडीला दोन आकडी संख्याही गाठता येणार नाही, असं दिसतंय. तर युतीच्या तब्बल 40 जागा निवडणून येतील असं आजचा मूड सांगतो. जर देशाच्या पातळीवर विचार केला तर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तरप्रदेशात महाआघाडी झाली तर एनडीएला फटका बसून, त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. तर यूपीएला काहीसा फायदा होणार असल्याचं देशाचा मूड सांगतो. 1. लोकसभेसाठी राज्यात सेना-भाजप युती नसताना पक्ष लोकसभेच्या जागा काँग्रेस 21 राष्ट्रवादी काँग्रेस 09 भाजप प्लस 16 शिवसेना 02 ------------------------------------------- 2. लोकसभेसाठी राज्यात सेना-भाजप युती असताना राज्यातील लोकसभेच्या जागा यूपीए 08 एनडीए प्लस शिवसेना 40 -------------------------------------------- 3. उत्तर प्रदेशात महाआघाडी नसताना लोकसभेच्या जागा यूपीए- 171 एनडीए प्लस शिवसेना- 291 इतर- 81 -------------------------------- 4. उत्तर प्रदेशात महाआघाडी असताना लोकसभेच्या जागा यूपीए -171 एनडीए प्लस शिवसेना- 247 इतर- 125 -------------------------------- 5. मराठा आरक्षणाचं समर्थन करता का ? होय- 67.7 नाही -30.9 सांगता येत नाही -1.3 -------------------------------- 6. मराठा आरक्षणामुळं ओबीसी भाजपविरोधात जातील ? होय- 45.4 नाही -49.4 सांगता येत नाही- 5.2 -------------------------------- 7. अयोध्या यात्रेचा सेनेला उ.प्रदेशात फायदा होईल ? होय, फायदा होईल- 41 नाही, पण फायदा होणार- 37 यात्रा राजकीय नव्हती- 16.4 सांगता येत नाही- 5.7 -------------------------------- 8.राज्यातील उत्तर भारतीयांसाठी सेनेनं राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला? होय, फायदा होईल- 46.2 नाही, पण फायदा होणार- 34.8 यात्रा राजकीय नव्हती- 14.6 सांगता येत नाही- 4.4 ------------------------------- 9. लोकसभा स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचा सेनेला फायदा होणार ? होय -32.9 नाही- 63.7 सांगता येत नाही- 3.4 ------------------------------- 10. दुष्काळग्रस्तांना सरकार करत असलेली मदत पुरेशी आहे का ? होय -38.3 नाही -53.9 सांगता येत नाही- 7.8 ------------------------------- 11. शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकार पुरेसे प्रयत्न करतंय का ? होय -39.2 नाही -57.9 सांगता येत नाही- 2.9 ------------------------------- 12. महाराष्ट्रात सर्वात प्रभावशाली विरोधी पक्ष कोणता ? काँग्रेस -44.3 राष्ट्रवादी काँग्रेस- 25.4 शिवसेना- 18.4 मनसे -1.5 भारिप-एमआयएम -1.3 डावे पक्ष- 0.6 सांगता येत नाही- 8.5 ------------------------------