Monsoon News : मान्सूनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्वांना दिलासा मिळाला आहे. अखेर रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. सरासरी मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो. यावेळी मात्र, तीन दिवस मान्सून आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, मान्सून दाखल होतो म्हणजे नेमकं काय होतं आणि मान्सून दाखल होण्यासाठीचे संकेत काय आहेत, यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितली आहे. 


मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक असणारे पाच संकेत


1) अरबी समुद्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासुन उंच आकाशात साडेचार किलो मीटर जाडीत वाहणारे समुद्री वारे
2) केरळच्या दिशेने जमिनीच्या समांतर ताशी 30 किलो मीटरने वाहणारे समुद्री वारे
3) आग्नेय अरबी समुद्रात आणि केरळ किनारपट्टी समोरील अलोट ढगाची दाटी
4) संध्याकाळी अरबी समुद्रातून पाण्याच्या पृष्ठभागवरुन प्रति चौरस मिटर क्षेत्रफळावरुन 190 व्याट्स वेगाने उत्सर्जित होऊन बाहेर फेकणारी लंबलहरी उष्णताऊर्जा
5) केरळमधील विखुरलेल्या 14 वर्षामापी केंद्रापैकी 10 केंद्रावर अडीच मिमी किंवा त्याहूनअधिक पावसाची झालेली नोंद यावरुन मान्सूनचे आगमन झाल्याचे ठरवले जाते.


वरील पाच गोष्टींची पूर्तता होत असल्यास मान्सून आल्याचे निश्चित केले जाते. मान्सून दाखल होण्यासाठी आवश्यक ती स्थिती निर्माण होणं गरजेचं असते. केरळमधील 14 वर्षामापी केंद्रापैकी 10 केंद्रावर अडीच मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद होणं गरजेचं आहे. तेव्हाच मान्सून आल्याचे जाहीर केले जाते.


4 ते 5 जूनला मान्सून महाराष्ट्रात


केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या सात दिवसात तळकोकणात दाखल होत असतो. यंदाही 4 ते 5 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तो मुंबई, पुणे अन्य ठिकाणी पाऊस बरसणार आहे. जूनमधील मान्सूनचा प्रवास पहिल्या दोन आठवड्यात मंदावलेला असेल, त्यानंतर तो सर्वत्र बरसेल अशी स्थिती दिसत आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं चांगलेची हजेरी लावल्याचे दिलस आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या: