Mamata Banerjee : ज्या दिवशी देशातील जनतेला एक चांगला पर्याय उपलब्ध होईल, त्यादिवशी भाजप सत्तेतून बाहेर असेल, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं. तसेच तृणमूल काँग्रेसह अन्य पक्षांनी एकत्र येत भाजपविरोधी ताकद उभारली पाहिजे असेही त्या म्हणाल्या. पक्षाच्या संघटनात्मक बैठकीला संबोधित करताना ममता बॅनर्जी बोलत होत्या. भाजप अजूनही सत्तेत आहे कारण, त्यांना कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.
ज्या दिवशी भाजपला पर्याय निर्माण होईल, त्या दिवशी भाजप सत्तेतून बाहेर फेकला जाईल असेही बॅनर्जी म्हणाल्या. दरम्यान, ममता बॅनर्जी या 5 मे पासून जनसंपर्क कार्यक्रम सुरु करणार आहेत. तो कार्यक्रम 21 जुलैपर्यंत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. बंगालमध्ये राम आणि बाम (भाजप आणि वामपंथी) एकत्र आले आहेत. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव कसा करायचा हे राज्य दाखवून देईल, असा विश्वास ममत बॅनर्जी यांनी व्यक्त केला.
गेल्या महिन्यातच ममता यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली होती
भाजपला दंगलखोरांचा पक्ष असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. विधानसभेत त्यांच्या सदस्यांनी केलेला गोंधळ अभूतपूर्व होता असे त्या म्हणाल्या. गेल्या महिन्यात, बॅनर्जी, यांची पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. त्यांनी एक नवीन राज्य समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये बहुतेक त्यांच्या निष्ठावंतांचा समावेश होता. पक्षातील जुने नेते आणि तरुण नेते यांच्यातील कथित सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही समिती स्थापन केली आहे.
प्रशांत किशोर हेही व्यासपीठावर उपस्थित
TMC सुप्रिमोने सुब्रत बक्षी यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि पार्थ चॅटर्जी यांची पुन्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी राज्याचे माजी अर्थमंत्री अमित मित्रा आणि 19 राज्य सरचिटणीसांसह सुमारे 20 उपाध्यक्षांची नियुक्ती केली. दरम्यान, टीएमसीचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर हे देखील या बैठकीत उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: