Weather Updates : देशात सातत्यानं तापमानात (Temperature) चढ उतार होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) दुहेरी वातावरण पाहायला मिळालं. बुधवारी रात्री दिल्लीत जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यानंतर दिल्लीत कडाक्याची थंडी पडली (Cold Weather) आहे. दिल्लीतबरोबरच उत्तर प्रदेश पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या ठिकाणीही थंडीचा जोर वाढला आहे. 


आणखी थंडी वाढण्याची शक्यता


देशात वातावरणात सतत बदल होत आहे. दिल्लीत अचानक पावसाने हजेरी लावली. पावसानंतर तिथे थंडीचा जोर वाढला आहे. हवामान विभागानं दिल्लीतील कर्नाल, पानिपत, देवबंद, नजीबाबाद, शामली, मुझफ्फरनगर, कंधाला, बिजनौर, खतौली, सकोटी तांडा, हस्तिनापूर, चंदपूर, दौराला, मेरठ इथे पुढील दोन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार दिल्लीत पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसात दिल्लीकरांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला होता. कारण दिल्ली NCR चे किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढले होते. मात्र, पावसानंतर पुन्हा एकदा किमान तापमानात घसरण झाली आहे. पावसामुळं थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


दिल्लीत तापमानात घट 


पाऊस पडण्यापूर्वी, दिल्ली एनसीआरमध्ये सरासरी कमाल तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस होते. बुधवारी किमान तापमान 12 अंश सेल्सिअस होते. पावसानंतर त्यात काहीशी घट झाली. रात्री 12 ते 1 वाजेदरम्यान कमाल तापमान 16 अंशांवर तर किमान तापमान 9 ते 11 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले. त्याचवेळी वाऱ्याचा वेग ताशी 13-15 किलोमीटर इतका नोंदवला गेला.


या राज्यांमध्ये थंडी कायम राहणार 


उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, बिहारमध्ये 13 जानेवारी 2023 पर्यंत थंडी राहणार असल्याची शक्यता  हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 15 आणि 16 जानेवारी 2023 रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली आणि राजस्थानच्या विविध भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. 


14 ते 16 जानेवारी दरम्यान तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसची घट होण्याचा अंदाज


हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार, 14 ते 16 जानेवारी दरम्यान किमान तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसची घट होऊ शकते. त्याचवेळी, पुढील 3 दिवसांत पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवसांत मध्य भारतातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : जळगावमध्ये वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम, चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं कोट्यवधी रुपयांचा फटका