IMD Weather Update Today : देशातील हवामानात (Weather Forecast) पुन्हा एकदा बदल होताना पाहायला मिळत आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत असून पुढील 24 तासात काही भागात पावसाची शक्यता (Rain Updates) आहे. हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच रविवारी 28 जानेवारीला पूर्व उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडी (Cold Weather) दाट धुके पडण्याची शक्यता आहे. आज जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि वरच्या भागात हिमवृष्टीची शक्यता आहे.


कुठे थंडी, तर कुठे पाऊस!


दिल्लीमध्ये जोरदारा धुक्याची चादर पसरली असून रेल्वे आणि विमान उड्डाणे उशिराने सुरु आहेत. एकीकडे उत्तर भारतात थंडीची लाट कायम असताना दुसरीकडे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल दिसून येत आहे. ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम 28 जानेवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारी 2024 पासून पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि उत्तर-पश्चिम भारताच्या लगतच्या मैदानांवर आणखी एका वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता असून हवामानात बदल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.


वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल


वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात पुढील दोन दिवसांत हलका पाऊस किंवा हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचंही आयएमडीने म्हटलं आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद येथे 28 आणि 31 जानेवारी 2024 रोजी इसोल मुसळधार पाऊस/हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.


'या' भागात पावसाची शक्यता


31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंडमध्ये हलक्या स्वरुपातील पाऊस किंवा हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील दोन दिवस जोरदार सरीसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik Weather Update : कडाक्याच्या थंडीने द्राक्ष पंढरी गारठली, उत्पादक धास्तावले; काय आहे निफाड, नाशिकचे तापमान?