Weather Forecast  Update : उत्तर भारतातील राज्यांमध्ये कधी ऊन तर कधी पाऊस पडताना दिसत आहे. तसेच काही ठिकाणी बर्फवृष्टी देखील होत आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका आहे. काल मात्र, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये कडाक्याचे ऊन पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक दिवसांपासून थंडीने त्रस्त असलेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनसार, बुधवारी पुन्हा एकदा हवामान बदलू शकते. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये थंडी वाढू शकते असे हवामान विभागाने सांगण्यात आले आहे.


दरम्यान, हवामान विभगाने दिलेल्या माहितीनुसर, आज राजधानी दिल्लीच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, बुधवारपासून पुन्हा एकदा हवामान बदल होऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार  पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा हवामान खराब राहणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. उत्तराखंडमध्ये उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये रविवारी हवामान स्वच्छ होते. बर्फवृष्टी थांबल्यानंतर चंबा-धनोल्टी हा मार्ग तीन दिवसांनी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तर गंगोत्री आणि यमुनोत्री महामार्ग अजूनही बंद आहेत. दरम्यान, काल हरिद्वारमध्ये ऊन पडले होते, मात्र डोंगराळ भागात बर्फ वितळल्याने दिवसभर जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला नाही.


मसुरीमध्ये येत्या काही दिवसामध्ये हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्य अंदाजानुसार, तिथे हलका सूर्यप्रकाश देखील पडू शकतो, ज्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल. दुसरीकडे, उत्तर प्रदेशमध्ये येत्या दोन दिवसांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पुढील 24 तासात पंजाब आणि बिहारमध्ये थंडीचा जोर आणखी वाढू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3 दिवसात उत्तर प्रदेशात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये पुढील दोन दिवस दाट धुके राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: