Hyundai Pakistan : सोशल मीडियावर कधीकाय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर #BoycottHyundai ची मागणी केली जात आहे. याला कारणही तसेच आहे. पाकिस्तान ह्युंदाईने काश्मीरसंदर्भात ट्विट केल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यावरुन नेटकरी चांगलेच भडकले आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे सोशल मीडियावर #BoycottHyundai हा हॅशटॅग काही काळासाठी ट्रेंड होत होता.
काय आहे व्हायरल फोटोमध्ये?
'काश्मीरमधील आपल्या लोकांच्या बलिदानाला आठवा आणि त्यांच्या समर्थनार्थ उभे राहा. कारण, ते स्वातंत्र्याच्या संघर्षाची कायमच प्रेरणा देतात. ' ह्युंदाई पाकिस्तानचे हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर भारतीय लोकांचा राग अनावर झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी आपली सर्व भडास सोशल मीडियावर व्यक्त केली. त्यामुळे सोशल मीडियावर #BoycottHyundai ट्रेंड करत आहे.
पाच फेब्रुवारी रोजी काश्मीर एकता दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी पुन्हा एकदा भारताविरोधात निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. दक्षिण कोरियामधील ह्युंदाईने पाकिस्तानच्या समर्थनार्थ ट्विट करत भारताचा राग ओढावून घेतला.
एका युजर्सने फोटो पोस्ट करत म्हटलेय की, ज्या व्यक्तीने अशी पोस्ट केली, त्या कर्मचाऱ्याला तात्काळ कामावरुन काढून टाकायला हवं. अनेक युजर्सनी #boycotthyundai ची मागणी केली.
ह्युंदाई इंडियाने मागितली माफी -
सोशल मीडियावर #boycotthyundai ची मागणी सुरु झाल्यानंतर ह्युंदाई इंडियाने ट्वीट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. मागील 25 वर्ष सुरु असलेली भारतातील यापुढेही अशीच सुरु राहिल अशी शाश्वती दिली आहे.