अहमदाबाद : ‘निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी खऱ्या अर्थानं काँग्रेसच जिंकली. त्यांच्याकडे सगळी साधने होती. पण आपण सत्याने निवडणूक लढलो.’ अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी गुजरातमधल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना शाबासकी दिली. आज गुजरातच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधींनी मोदींना हा टोला लगावला.


दरम्यान, 2022च्या गुजरात निवडणुकीत काँग्रेस 135 जागांवर विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गुजरातच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं.

दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी गुजरातच्या नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या. 'आमचा लढा सुरुच राहिल. आपल्याला ही लढाई पुढे न्यायची आहे. पुढील पाच वर्ष भाजप काही उद्योगपतीचं सरकार चालवणार आहे. आपल्याला शेतकरी आणि तरुणांचा विचार करायचा आहे. गुजरातनं दाखवून दिलं आहे की, जर काँग्रेस उभी राहिली आणि एका विचारधारेनं लढली तर कधीही हरत नाही. आपण हरलो नाही तर जिंकलो आहोत.' असं म्हणत राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

‘गुजरातनं माझं मन जिंकलं आहे. त्यामुळे मी इथं कायम येत राहिन.’ असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

'या' 12 जागांमुळे काँग्रेस सत्तेपासून दूर

भाजपला पाडण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले : मोदी

कामगिरी समाधानकारक असूनही गुजरातमध्ये काँग्रेसला मोठे हादरे

गुजरातमधील जनता भाजपवर नाराज, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

दोन्हीही राज्यातील निकालांनी नाराज नाही : राहुल गांधी

EVMसोबत छेडछाड करुन विजय मिळवणाऱ्या भाजपला शुभेच्छा : हार्दिक पटेल