हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ‘जेव्हा आम्ही हिरवा रंग परिधान करु तेव्हा सर्व ठिकाणी हिरवाच रंग दिसेल. आमच्या हिरव्या रंगासमोर कुठलाही रंग टिकणार नाही. आमच्या रंगासमोर ना मोदींचा रंग, ना काँग्रेसचा रंग… कोणताचा रंग टिकणार नाही. फक्त हिरवा रंग पाहाल.’ असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले. हैदराबादमध्ये शुक्रवारी रात्री एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केलं.


गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मुस्लिम मतांमध्ये रुची दाखवली नाही. मुस्लिम मतदारांचं धुव्रीकरण करुन ते निवडणुका जिंकू शकतात. पण अशाने आपली लोकशाही कमकुवत होईल. जाणीवपूर्वक मुस्लिमांचा राजकीय प्रभाव कमी करणे हे चांगले नाही असंही ओवेसी यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी राजस्थानच्या राजसमंदमधील हत्याकांडांचाही उल्लेख केला. 'जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आलं आहे तेव्हापासून अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.' असं म्हणत ओवेसींनी मोदी सरकारवर टीका केली.

संबंधित बातम्या :

गुजरात निवडणुकीत ओवेसींची एंट्री, पाटीदार आरक्षणावरुन काँग्रेसला घेरलं

अकबरुद्दीन ओवेसींचं पुन्हा प्रक्षोभक वक्तव्य

अल्पसंख्यांकांवरील जुन्या वक्तव्यावरुन ओवेसींचं कोविंद यांच्यावर टीकास्त्र

भारताला हिंदू राष्ट्र कधीच होऊ देणार नाही : ओवेसी

ओवेसींकडून MIM ची राज्यातील कोअर कमिटी बरखास्त

आम्ही भारतीय आहोत आणि राहू : असदुद्दीन ओवेसी