नवी दिल्ली : वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक राफेलवरुन देशात खूप राजकारण करत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशाला राफेलची कमतरता जाणवली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात मोदी बोलत होते.

मोदींनी सांगितले की, लोक मला विचारत आहेत की, जर आत्ता आपल्याकडे राफेल असतं तर काय झालं असतं? आपल्याकडे आत्ता राफेल असायला हवं होतं. ज्या लोकांना मोदीचा विरोध करायचा असेल त्यांनी खुशाल करावा, परंतु मोदीचा विरोध करत असताना देशाच्या हिताचा विरोध करु नका, असे आवाहन मोदींनी विरोधकांना केले आहे.

मोदी म्हणाले की, देशासमोर आज खूप मोठी आव्हाने आहेत. दहशतवाद हे त्यापैकी मोठे आव्हान आहे. दहशतवाद्यांना सहाय्य करणारे खूप लोक आहेत. परंतु त्याचबरोबर आपल्याच देशातील काही लोक देशासमोर मोठं आव्हान निर्माण करत आहेत. देशाला त्यांच्याकडून मोठा विरोध होत आहे.

जवानांबाबत मोदी म्हणाले की, सध्या देश आपल्या जवानांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. परंतु काही लोक हे भारतीय लष्करावरच संशय व्यक्त करतात. परंतु सर्व देशवासियांनी असेच आपल्या जवानांच्या पाठिशी उभं रहायला हवं