Uttarakhand : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एचसीसी (हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी) च्या एका बोगद्यात मोठा अपघात झाला आहे. बोगद्यात अचानक पाणी आणि मलबा आल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये 18 कामगार आत अडकल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना रात्री सहा वाजून 10 मिनीटांच्या आसपास घडली आहे. कामगार काम करत असताना अचानक घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ढिगारा आणि पाण्याचा अचानक शिरकाव झाल्याने घबराट
दरम्यान, चमोलीतील पिपलकोटी येथील विष्णुगड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अचानक मोठ्या प्रमाणात ढिगारा आणि पाणी शिरल्याने एक मोठा अपघात घडला. सुमारे 18 कामगार बोगद्यात अडकले होते. बचाव पथकांनी दोन कामगारांना सुखरूप बाहेर काढले असून, उर्वरित कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी 6.10 च्या सुमारास घडला. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अचानक मोठ्या प्रमाणात ढिगारा आणि पाणी शिरले. त्यावेळी कामगार बोगद्यात काम करत होते. ढिगारा आणि पाण्याचा अचानक शिरकाव झाल्याने घबराट पसरली आणि अंदाजे 18 कामगार आत अडकले.
अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
घटनेची माहिती मिळताच, बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. प्राथमिक प्रयत्नांतून दोन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात झालेल्या या धक्कादायक घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, काम सुरु असताना बोगद्यात पाणी आणि मलबा नेमका कसा आला? हे अद्याप समजलं नाही. मात्र, या अपघाच्या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली असून कामगारांच्या नातेवाईकांमध्य चिंतेचं वातावरण आहे.
पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि प्रशासकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत. युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. बोगद्यात अचानक पाणी शिरल्यामुळे आत असलेले कामगार अडकण्याचा धोका आहे, त्यामुळे बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली असून, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बोगद्यात अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्याचा बचाव पथके प्रयत्न करत आहेत. चमोली जिल्ह्यातील या घटनेला एक मोठी आपत्ती म्हणून पाहिले जात आहे.