आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधून आगीची बातमी येत आहे. मंगळवारी दुपारी येथील एचपीसीएलच्या प्लांटमध्ये भीषण आग लागली. वृत्तसंस्था एएनआयनुसार आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहेत.


या घटनेत झालेल्या नुकसानबद्दल सविस्तर माहिती अद्याप मिळालेली असून आगीचे कारणासह अन्य माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे.


वृत्तानुसार एपीसीएलच्या जुन्या टर्मिनलच्या क्रूड डिस्टिलेशन युनिटमध्ये भीषण आग लागली आहे. घटनेनंतर लगेचच आपत्कालीन सायरन वाजला आणि कर्मचारी व कामगार युनिटच्या बाहेर आले. प्लांटमधून बाहेर पडलेल्या काही कामगारांनी सांगितले की स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर आग बाहेर येऊ लागली. सायरन वाजवत आम्ही सर्वजण सुखरूप बाहेर आलो. आगीनंतर तत्काळ प्लांटमधील अग्निशामक दल व बाहेरून आलेल्या अग्निशामक यंत्रांना आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहे. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.