नवी दिल्ली : दिल्लीतील एक सीरियल किसर, जो कुणाला काही सुगावा लागणार नाही अशाप्रकारे येतो आणि कोणाला काही समजण्याच्या आतच मुलीला किस करुन तिथून पळून जातो. गेले काही दिवस सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ सध्या वादाचा मुद्दा बनला आहे.

व्हिडीओत मुलींना किस करुन पळून जाणाऱ्या या मुलाचं नाव आहे सुमित.

हा व्हिडीओ जेव्हा सुरु होतो तेव्हा सुमित पार्कातल्या एका बेंचवर बसलेला दिसतोय. एका कागदावर फेस आलेलं फोम जेल दिसून येतंय. त्यानंतर सुमित पार्कात बसलेल्या एका मुला-मुलीच्या दिशेने जातो. दोघेजण एकमेकांशी बोलण्यात गुंतले असतानाच अचानक मुलाच्या तोंडावर जेल लावून मुलीला किस करुन पळून जातो. तो मुलगा सुमितचा पाठलाग करतो पण तो पळून जाण्यात यशस्वी होतो...

दुसरी घटना ही दिल्लीचा कनॉट प्लेसचा परिसरातील असावी असं वाटतं. लांबून येणारी एक मुलगी दिसते. ती मुलगी आपल्याच विचारात चालत असताना अचानक सुमित तिथे येतो. त्यानंतर तो त्या मुलीला अचानक किस करुन पळून जातो. मुलगीही त्याच्या मागे पळते. भर रस्त्यात झालेल्या या घटनेने मुलगी हैराण झालेली पाहायला मिळते.



या व्हायरल व्हिडीओचा तिसरा आणि शेवटचा व्हिडीओ. समोरुन एक मुलगा आणि मुलगी सोबत येताना दिसतात. इतक्यात सुमित आपल्या खिशातून ती फेसाळ जेली काढतो आणि मुलाच्या तोंडाला लावतो. मुलीला किस करुन पळून जातो. दरवेळेप्रमाणे यावेळीही सुमित पळून जाण्यात यशस्वी ठरतो.

या सगळ्या घटना सुमितचा मित्र त्याच्या कॅमेरात टिपतो. पण या घटनेचा उद्रेक तेव्हा झाला जेव्हा सुमितने हे सगळे व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केले.

हा व्हिडीओ बघणाऱ्या लोकांनी सुमितच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. व्हिडीओ पाहणऱ्या लोकांनी सोशल मीडियावर लिहिलंय की अशी गोष्ट करण्याची हिंमत कोणी कसं करु शकतं.

मजेच्या नावाखाली रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीचा तिच्या इच्छेविरोधात किस घेणं आणि तिथून पळून जाणं यातून कोणती संस्कृती दिसतेय? या नंतरही हे सगळे व्हिडाओ सोशल मिडियावर अपलोड करायला त्या मुलाला पोलिसांचीही काही भीती वाटत नाही का?

नैना यादवने लिहिलंय की, एका मुलीला त्रास देणं ही मजा कशी होऊ शकते? मुलांमधली ही मानसिकता नेमकी कशी बदलायची की ज्यामुळे मुलं अशा गोष्टी करणार नाहीत.


 

सोशल मिडियावर अशा तीव्र प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. प्रसिद्ध रॅपर रफ्तारनेही सुमितच्या या व्हिडीओला उत्तर दिलं आहे. धमकीही दिलीय की जर या नंतर तू असं काही केलंस तर तुला घरात येऊन मारेन.


 

पण सुमितचा दावा आहे कि हा व्हिडीओ म्हणजे एक प्रँक आहे...म्हणजे निव्वळ मजा.



मात्र प्रश्न असा आहे की ज्या मुली या व्हिडीओमध्ये दिसतात त्यांना याबाबत माहित होतं का? त्या मुली सुमितच्या प्रँकचा भाग होत्या का?

जर त्या मुली या टीमच्या मेंबर नसतील तर सुमितने त्यांना कसं काय यासाठी तयार केलं?

जर मुलींना याबाबत कोणतीच माहिती नसेल तर सुमितने हे सगळे व्हिडीओ त्याच्या क्रेझी सुमित या यू ट्यूब चॅनलवर कसं काय अपलोड केले? सुमितला माहित नाही का, असे व्हिडीओ अपलोड केल्याने त्याला शिक्षा होऊ शकते?

या साऱ्याची पडताळणी करण्यासाठी 'एबीपी न्यूज'च्या प्रतिनीधींनी या बातमीमागचं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात आधी आमच्या हाती अशी बातमी आली की लोकांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे सुमितने आपल्या चॅनलवरून सगळे व्हिडीओ डिलीट केले. त्याने त्याच्या चॅनलवर माफीचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे.

देशात 2015 मध्ये महिलांच्या छेडछाडीच्या 82 हजारांहून जास्त घटना उघडकीस आल्या आणि 2011 मध्ये याची संख्या होती 42 हजार. म्हणजेच चार वर्षात या गुन्ह्यात तब्बल दुपटीने वाढ झालेली दिसत आहे.

कुठलाही व्हडीओ मी कोणाच्याही परवानगीशिवाय शूट करत नाही. तुम्ही पाहिलं तर इथे कॅमेरा आहे आणि शूट चालू आहे. कुणालाही दुखवण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती.

क्रेझी सुमित नावावरुन असे बरेच प्रँक बनवत असतो. पण यावेळी हा व्हिडीओ जरा गंभीर होता.

आता मात्र पोलिसांपर्यंत तक्रार गेली आहे. पण पोलिसांचं म्हणणं आहे की जर या व्हिडीओत असणाऱ्या मुलींनी स्वत:हून पुढे येऊन साक्ष दिली तरच त्याची मदत होऊ शकते.



'एबीपी न्यूज'ने सुमितशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सुमितचा नंबर मिळाला नाही तर आम्ही त्याला तीन वेळा ई-मेल केला. पण त्या ई-मेल ला काहीही उत्तर मिळालं नाही. पोलिसांनी मात्र यू ट्यूब आणि फेसबुकला नोटीस पाठवून त्याचा आयपी अॅड्रेस मागवला आहे.

आमच्या पडताळणीत असं समोर आलंय की सुमितने यु ट्यूबवर हिट्स मिळावेत म्हणून हा प्रँक तयार केला. पण आता मात्र तो त्याला महागात पडत आहे.

- म्हणजे हा व्हिडीओ एक मजा होती हे समोर आलं आहे.

- व्हिडीओ बनवणाऱ्या सुमितने आता माफी मागितली आहे.

- सुमितचं असं म्हणणं आहे की तो कोणाच्याही परवानगीशिवाय व्हिडीओ बनवत नाही.

- पण शेवटी असाही प्रश्न उरतो की त्या मुलींना याबाबतची माहिती होती का?

आता मात्र या किस करुन पळून जाणाऱ्या व्हिडीओची पोलिसांकडून पडताळणी सुरु आहे. ते झाल्यावर सत्य काय ते समोर येईलच.

 
पाहा व्हिडीओ