'अविवाहीत राहा तरच आयुष्यात यशस्वी व्हाल', रामदेव बाबांचं अजब तर्कट
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2017 03:39 PM (IST)
कर्जत: 'जर खूप मोठं व्हायचं असेल तर अविवाहित राहा. अविवाहित व्यक्ती अधिकाधिक कामं करु शकतात.' असं अजब तर्कट योगगुरु रामदेव बाबा यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांनी स्वत: व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचंही उदाहरण दिलं. पतंजलिच्या माध्यमातून बाजारपेठेत दबदबा निर्माण केल्यानंतर रामदेव बाबा आता टीव्हीच्या क्षेत्रातही उतरत आहेत. रामदेव बाबा चित्रपट निर्माते मधूर भांडारकर यांच्यासोबत विद्रोही संन्यासी नावाची मालिका सुरु करत आहेत. महापुरुष स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर आधारीत ही मालिका असणार आहे. त्याच्या शुभारंभासाठी आज रामदेव बाबा कर्जतमध्ये आले होते.