सोशल मीडियावरील काही हटके मेसेज
''विवाहित पुरूषांसाठी खूशखबर...
ज्या बायकांनी नवऱ्यापासून पैसे लपवून (500, 1000 च्या नोटा) ठेवले आहेत त्यांचेही काळे धन आता बाहेर निघणार''
''आज भारतात पहिल्यांदा गरिब हसत आहे आणि श्रीमंत रडत आहे''
''हे वर्ष भारीच, देवाने सगळेच ऐकले..
येरे येरे पावसा..
तुला देतो पैसा
पाऊस आला मोठा
पैसा झाला खोटा''
''पुणेरी लग्न पत्रिका,
कृपया आहेराच्या पाकिटात 500, 1000 च्या नोटा खपवू नये''
''पोलीस : लायसन्स आहे का ?
मी : नाही
पोलिस : 100 ची पावती करावी लागेल
मी : 500 घ्या सोडून द्या''
''नोकर वर्ग...
पगार झाल्यावर 100 च्या नोटांनी
खिसा अगदी गच्च भरेल
फिलींग ऑसम''
''पुणेरी पाटी...
येथे हजार पाचशेच्या नोटांची रद्दी घेतली जाईल..''
''आज ज्यांना शांत झोप लागणार तेच सर्वात श्रीमंत''
संबंधित बातमी :