Andhra Pradesh : आंध्र प्रदेशच्या कोनासिमा जिल्ह्याचे नाव बदलून डॉ. बी आर आंबेडकर कोनासिमा (BR Ambedkar Konaseema) म्हणून नामकरण करण्याच्या प्रस्तावाविरुद्ध मंगळवारी जिल्हा मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याच्या नामकरणाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केल्यानंतर मोठा राडा झाली. हिंसेनंतर परिवहन मंत्री पी. विश्वरुप यांच्या घराला आग लावण्यात आली. दरम्यान पोलिसांनी मंत्री विश्वरुप आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढले.
राज्याच्या गृहमंत्री तानेती वनिता यांनी काही राजकीय पक्ष आणि समाजकंटकांनी आंदोलकांना भडकवल्याचा आरोप केला आहे. गृहमंत्री म्हणाल्या की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेत आतापर्यंत 20 पोलीस जखमी झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात पोलिसांच्या एक व्हॅन आणि शिक्षण संस्थेच्या बसला देखील आग लावण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी या वेळी केली आहे.
चार एप्रिलला पूर्व गोदावरी जिल्ह्यातून कोनासीमा जिल्हा वेगळा करण्यात आला. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने कोनासीमा जिल्ह्याचे नाव बदलून बी आर आंबेडर कोनासीमा जिल्हा नाव करण्याची अधिसूचना जारी केली. त्यानंतर कोनसीमा साधना समितीचं (Konaseema Sadhana Samiti) नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला आणि जिल्ह्याचे कोनसीमा (Konaseema) ठेवण्याची मागणी केली. समितीने मंगळवारी जिल्हाधिकारी हिमांशु शुक्ला यांच्या विरुद्ध नाव जिल्ह्याचे नाव बदलण्याविरोधात आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलन प्रयत्न केल्यावर आंदोलक संतप्त झाले आणि अखेर शांत अमलापुरममध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली.