हैदराबाद: मुघलांशी भारतीय मुस्लिमांचा कोणताही संबंध नाही पण मुघल सम्राटांच्या बायका कोण होत्या असा प्रश्न एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी केला आहे. असदुद्दीन औवेसी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून हा सवाल विचारला. ज्ञानवापी मशिद आणि कुतूब मिनार वरुन सुरू असलेल्या वादावर औवेसी यांनी हे वक्तव्य केलं आहे.


औवेसी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मुघलांचा आणि भारतीय मुस्लिमांचा काही संबंध नाही. पण हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या? औवेसी यांच्या या पोस्टनंतर आता वाद होण्याची शक्यता आहे. 




भारतीय मुस्लिमांनी देशाला समृद्ध बनवलं
औवेसी आरएसएसवर निशाणा साधताना म्हणाले की,  स्वाभिमान आणि सहानूभूती या गोष्टी आरएसएस मध्ये शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी मदरशांमध्ये शिकवलं जातंय. भारतीय मुस्लिमांनी देशाला समृद्ध केलं आणि यापुढेही करत राहतील.


ज्ञानवापी मशिद आणि कुतूब मिनार वरून जो काही वाद सुरू आहे, त्यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन औवेसी यांनी भाष्य केलं. 


ज्ञानवापी मशिदीवर 26 मे रोजी सुनावणी
ज्ञानवापी मशिदी प्रकरणी आज वारणसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. आज दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. या प्रकरणी आता 26 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे. सुनावणीनंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन म्हणाले की, " मुस्लिम पक्षाच्या बाजूच्आ आदेशाच्या याचिकेवर 7 11 सीपीसी अंतर्गत याचिकांवर 26 मे रोजी सुनावणी होईल." न्यायालयानं दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.


सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा कोर्टासमोर सुरू झाली. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे कोर्टाने पाहावेत, त्यानंतर त्यापुढील सुनावणी करावी अशी मागणी केली. तर, मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती.