मुंबई : भारतीय बँकांना नऊ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशाबाहेर पसार झालेल्या विजय मल्ल्या तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 62 वर्षीय विजय मल्ल्या त्याची गर्लफ्रेण्ड पिंकी लालवानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.


कोण पिंकी लालवानी?

पिंकी लालवानी ही विजम मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्समध्ये एअरहोस्टेस होती. पिंकी आणि विजय मल्ल्याची भेट 2011 मध्ये झाली होती. तेव्हा मल्ल्याने तिला किंगफिशर एअरलाईन्समध्ये नोकरी करण्याची ऑफर दिली होती.

किंगफिशर एअरलाईन्समध्ये आल्यानंतर पिंकी आणिर मल्ल्या यांच्यात जवळीक वाढली. दोघे कायम सोबत दिसायचे. हे दोघे मागील काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.

विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश

पहिल्या दोन लग्नापासून तीन अपत्य

मल्ल्याचं पहिलं लग्न 1986 मध्ये समीरा तयाबजीसोबत झालं होतं. तीदेखील एयरहोस्टेस होती. तिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याने 1993 मध्ये रेखा मल्ल्याशी लग्न केलं. ती अजूनही कायदेशीररित्या मल्ल्याची पत्नी आहे. आता विजय मल्ल्या पिंकी लालवानीसोबत तिसरं लग्न करणार आहे.

पहिल्या दोन लग्नांपासून मल्ल्याला तीन अपत्य आहेत. मुलाचं नाव सिद्धार्थ असून लीना-तान्या ह्या दोन मुली आहेत.

 बँकांची फसवणूक करुन मल्ल्या परदेशात

उद्योजक विजय मल्ल्याने 17 बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पलायन केलं. गेल्या वर्षी जून महिन्यात मल्ल्याला फरार घोषित करण्यात आलं होतं. त्याला भारतात आणण्याचे जोरदार प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहेत. मल्ल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. तर एप्रिलमध्ये भारताने विजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द केला होता. पिंकी लालवानी त्याच्यासोबत कोर्टातही दिसली होती.